नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मनोहर भिडे यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या सुचनेनुसार आज दि. ३१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन केले. त्यानंतर यावेळी उपजिल्हाधिकारी श्री.पारध्ये यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदनात म्हटले की, महात्मा गांधी हे भारताचे राष्ट्रपिता असून त्यांच्या बद्दल अपशब्द वापरणे हा देशद्रोहाचा गुन्हा ठरतो. मनोहर भिडेंनी महात्मा गांधी यांच्याबाबत अत्यंत निंदा नालस्ती करणारं विधान केल्याने समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करावी. समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करण्याचा त्याने यापुर्वीही प्रयत्न केला आहे. संभाजी भिडे हे प्रत्येकवेळी अनेक महापुरुषांबद्दल अपशब्द वापरून तरुणांची माथेफिरून दिशाभूल करत आहे. अनेक वर्षांपासून भिडे अशी चिथावणीखोर वक्तव्ये करत आहेत. भिडे जातीवाचक वक्तव्य करत असल्याने दोन समाजात जातीय तेढ निर्माण होऊन दंगली घडू शकतात. जगात ख्याती असणाऱ्या राष्ट्रपित्याबद्दल अशी वक्तव्ये करणाऱ्या मनोहर भिडें विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून समाजात तेढ निर्माण करून दंगलीचे बीज पेरणाऱ्या भिडेला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, नानासाहेब महाले, महिला शहराध्यक्षा योगिता आहेर, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे शहराध्यक्ष कविता कर्डक, आशा भंदुरे, पूजा आहेर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, गौरव गोवर्धने, ज्ञानेश्वर दराडे, संजय खैरनार, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, शंकर मोकळ, अमोल नाईक, सुनिल अहिरे, शंकरराव पिंगळे, भगवान भंदगे, नाना पवार, योगेश दिवे, योगेश निसाळ, विनोद डोके, नाना साबळे, संतोष भुजबळ, मुरलीधर भामरे, जीवा बच्छाव, दिपक खैरनार, एकनाथ पाटील, संजय मोरे, कैलास खैरनार, ज्ञानेश्वर नाईकवाडे, रितेश केदारे, सोनू वायकर, प्रशांत वाघ, किरण भावसार, गणेश सुर्यवंशी, अकिल खान, पोपटराव जेजुरकर, श्रीराम मंडळ, रंजना गांगुर्डे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.