मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. आज मुंबई येथील बाळासाहेबांची शिवसेना भवनात नाशिक शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला, याप्रसंगी महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेशजी म्हस्के, सचिव भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, ज्येष्ठ नेते राजू आण्णा लवटे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, नगरसेवक सुदाम डेमसे, दिगंबर मोगरे, सचिन भोसले आदी उपस्थित होते.
यंनी केला प्रवेश
नाशिक ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी पूर्व विधानसभा प्रमुख योगेश बेलदार, शहर संघटक अनिल साळुंखे, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना महाराष्ट्र उपसचिव बापू लहूजी ताकाटे, नाशिक रोड शिवसेना समन्वयक शिवा ताकाटे, उप महानगर प्रमुख योगेश चव्हाणके, अमोल सूर्यवंशी, प्रमोद लासुरे, युवसेना उप जिल्हाप्रमुख प्रमुख रुपेश पालकर युवसेना नाशिक जिल्हा सरचिटणीस संदेश लवटे, विभाग प्रमुख नाना काळे, उमेश चव्हाण, प्रमोद जाधव, संदीप डहांके, विनोद नुनसे, शैलेश कार्ले, प्रसन्ना तांबट, अमेय जाधव, सहाय्यक संपर्क प्रमुख पच्छिम विधानसभा, महासचिव विश्व ब्राम्हण महापरिषद ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख महेश जोशी, उप विभाग प्रमुख राहुल देशमुख, प्रशांत गाडगीळ, प्रशांत निचल, स्वप्नील गायकवाड, अजय निकम, राजेश गीते, महेश लोखंडे, प्रमोद काशेकर, योगेश धामणस्कर, युवसेना महानगर संघटक गोकुळ मते, युवसेना उप महानगर प्रमुख, पोलीस बॉइज संघटना जिल्हा अध्यक्ष विशाल खैरनार , युवसेना पूर्व विधानसभा प्रसिध्द प्रमुख अंकुश बोचरे, युवसेना शहर समन्वयक आकाश काळे , युवसेना विस्तारक सोशल मिडिया राकेश झोरे, युवसेना विभाग प्रमुख मोहित पन्हाळे, अमित गांगुर्डे, समीर कांबळे, शाखाप्रमुख गणेश परदेशी, राहुल रंधे, अमोल वराडे, अनिल निरभवणे, प्रशांत निचळ, तकदीर कडवे, विशाल आहेर, आनंद गटकळ, धीरज कडाळे, महाराष्ट्र शिव वाहतुक सेनाचे महाराष्ट्रराज्य सचिव लक्षुमण (नाना) पाटील, नाशिकशहर अध्यक्ष मनोज ऊदावंत, नाशिकजिल्हा प्रमुख आनिल नागरे, नाशिकजिल्हा उपअध्यक्ष संदिप कदम, नाशिकजिल्हा प्रसीध्दीप्रमुख रविद्र पेहेरकर, सिन्नरतालुका अध्यक्ष पंकज भालेराव, सिन्नरतालुका उपअध्यक्ष आनिल शिंदे, नाशिकरोड अध्यक्ष उमेश सोनार, नाशिक जिल्हा उपअध्यक्ष संजय गवळी, उपजिल्हाध्यक्ष ग्रामीण योगेश सावकार, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष अभिजीत तागड यांनी राजू आण्णा लवटे व अजय बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला.
लवकरच नियुक्त्या
या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व पदाधिकाऱ्यांचा संघटनेत उचित सन्मान राखला जाईल असे आश्वासन दिली असून नाशिकच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचे आदेशित केले. बाळासाहेबांच्या शिवसेनेत नाशिकचे आजुन प्रवेश होणार असून यात नगरसेवक, नगरसेविका, शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची माहिती राजू लवटे व अजय बोरस्ते यांनी दिली.
Politics Nashik Leaders Join Balasahebanchi Shivsena
Thackeray Group Shinde Group Eknath Shinde