नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरासह जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हा प्रवेश सोहळा मध्यरात्री पार पडला. यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेतील अनेक पदाधिकारी व नेते उपस्थित होते.
दिंडोरी तालुक्यातील माजी आमदारांसह आजी माजी पदाधिकारी सरपंच, उप सरपंच, माजी सरपंच, माजी उप सरपंच, दिंडोरी ग्राम पंचायत सदस्य यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश सोहळा झाला. तसेच, नाशिकच्या माजी नगरसेवकांसह नाशिक जिल्हा व महानगरातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, सचिव भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, नाशिक मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, राजू लवटे, ग्रामीण जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकाऱ्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश सोहळा संपन्न झाला.
ग्रामीण भागातील नेत्यांची नावे
दिंडोरीचे माजी आमदार धनराज हरिभाऊ महाले, सहकार नेते, मा. जिल्हा परिषद सदस्य सुरेश डोखळे, शिवसेना नाशिक ग्रामीण जिल्हा प्रमुख सुनील पाटील, मा. संचालक कादवा, एम. व्ही. पी. संचालक नाशिक संपतकाका घडवजे, जेष्ठ नेते बाळासाहेब मेधने, मा. सभापती पंचायत समिती दिंडोरी भगवान ढगे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष दिंडोरी बाळासाहेब दिवटे, सोसायटी चेअरमन सचिन बर्डे, शिवसेना उप तालुका प्रमुख, उप सरपंच संजुभाऊ ढगे यांच्या सह विलास गोसावी, विठ्ठलराव रामदास उगले, सुभाष राउत, किरण कड तालुका प्रमुख युवसेना सोशल मिडिया, उप तालुका प्रमुख संजुभाऊ ढगे, कांतीलाल गायकवाड, मा. तालुका प्रमुख युवसेना दिंडोरी गणेश दवंगे, मा. उप तालुका प्रमुख शिवसेना संतोष कहाणे, दीपक चौधरी सरपंच करंजाळी, रामदास गायकवाड सरपंच खोरी, माणिक बंडू जोपळे सरपंच करंजखेड, नाना गायकवाड सरपंच चोरसे, योगेश दवंगे सरपंच जउलके वणी, चंद्रकला भाऊसाहेब जाधव सरपंच जोपूळ, गोविंद गायकवाड सरपंच जोरन, सुरज राउत सरपंच टिटवे, प्रल्हाद दळवी सरपंच दहवी, कांतीलाल चव्हाण सरपंच देवठाण (देवपूर), माजी सरपंच नंदुभाऊ बोंबले, देविदास गांगोडे, उत्तमराव गावंडे, माधव दादा उगले उप सरपंच जोपूळ, प्रवीण चौधरी उप सरपंच एकलहरे, प्रभाकर मुरलीधर उगले मा. उप सरपंच जोपूळ, ग्राम पंचायत सदस्य मंगेश गांगुर्डे, योगेश निखाडे, विठ्ठल गांगोडे, अशोक भोई, सचिन जाधव, हेमंत गायकवाड, हेमंत गायकवाड, सोपान उगले, नवनाथ पगार, गोपीनाथ वाघ, मिथुन वाघ, सुकदेव पाटील मा. पोलीस पाटील यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
नाशिक शहरातील नेते असे
नाशिक शहरातील माजी नगरसेवक हरीश भडांगे, माजी नगरसेविका मंदाकिनी जाधव, शिवसेना शिक्षण मंडळ सदस्य व शिवसेना महानगर संघटक बाबुराव आढाव यांनी देखील बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य शिवसंग्राम संघटनेचे सरचिटणीस अँड. विजय तुळशीदास कातोरे, मा. युवक अध्यक्ष, नाशिकरोड रा. काँग्रेस विलास पाटील, शेखर भैय्याजी देवरे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस, भूषण जोरवर पदाधिकारी युवक काँग्रेस, सुनील महाले अध्यक्ष नाशिक महानगर राष्ट्रवादी व्यापारी आघाडी, अँड. साहेबराव बोराडे सदस्य, नोटरी असो. महा. राज्य, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर तुंगार, विभाग प्रमुख जेलरोड राष्ट्रवादी काँग्रेस दिपक बोराडे, मा. पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस सुनील मेहरीलिया, सामाजिक कार्यकर्ते नंदू पांडे, सुयश पागेरे, स्वप्निल कातोरे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी नगरसेवक सूर्यकांत लवटे, सुदाम डेमसे, आर डी धोंगडे, नितीन खर्जुल, प्रताप मेहरोलीया, अँड. अभय महादास, लकी ढोकणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Politics Nashik City District Leaders Join Balasahebanchi Shivsena
CM Eknath Shinde