मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्ग टोल नाका फोडल्याच समजल्यानंतर अमित ठाकरे यांच्या चेहऱ्यावर असुरी आनंद दिसला. त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना टोल नाका फोडायला भाग पाडले असे आरोप भाजपाने केल्यानंतर आता या तोडफोडीवरुन मनसे आणि भाजपामध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु झाले आहे. भाजपने भाजपाने प्रत्युत्तर देतांना दादागिरी सहन करणार नाही, असे म्हटले होते. टोल नाक्यावर फास्ट टॅगची समस्या असल्यामुळे अमित ठाकरे यांची गाडी फक्त तीन ते साडेतीन मिनिट थांबवण्यात आली होती. अमित ठाकरे खोट बोलतायत, असा आरोपही केला.
मनसेने दिले हे प्रत्युत्तर
मनविसे अध्यक्ष अमित ठाकरेंचं हेच विधान इतकं झोंबलंय कि पृथ्वीवरचा सर्वात मोठा पक्ष ह्या ३१ वर्षाच्या तरुणावर तुटून पडलाय. आणि हो, कायदा-सुव्यवस्थेची इतकी काळजी असेल तर महाराष्ट्रातल्या मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण का वाढतंय ? मुलींवर दिवसाढवळ्या कोयत्याने का वार होत आहेत ? बस अपघातांमध्ये आपली माणसं दगावतात आणि एकीकडे त्यांचा अंत्यसंस्कार सुरु असताना पक्ष फोडून मंत्र्यांचे शपथविधी कसे घेतले जातात? माणसं किड्या-मुंग्यांसारखी मरत आहेत आणि त्याचं सोयरंसुतक नसणारे निरंकुश सत्ताधीश पक्ष फोडण्यात मश्गुल आहेत.
एक टोल नाका फुटला म्हणून एवढी थोबाडं उघडली- संदीप देशपांडे
ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांचे पक्ष फोडले, ते आम्हाला पक्ष बांधण्याबद्दल काय शिकवणार ? त्यांनी दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा स्वत:चा पक्ष बांधावा असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. एक टोल नाका फुटला म्हणून एवढी थोबाडं उघडली, पण मणिपूरमध्ये एवढ्या घटना घडल्या, त्यावेळी महाराष्ट्र भाजपा गप्प का होती ?