मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजकीय भूकंप, सत्तासंघर्ष आणि बंडखोरी यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्याची सध्या सर्वत्र चर्चाही होत आहे. त्याशिवाय सर्वसामान्यांना आता राजकारणाचा प्रचंड तिटकारा येत आहे. पक्ष निष्ठा, आदर आणि अन्य बाबी अडगळीत पडल्या आहेत. त्यामुळेही सर्वसामान्यांना याची चिड येत आहे. खासकरुन या सर्व प्रकरणात कार्यकर्त्यांची प्रचंड गोची होत आहे. नेमका कुणाचा झेंडा हाती घ्यावा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह पायाभूत सोयी-सुविधांची कामे प्रभावित झाली आहेत. या सर्वावर भाष्य करणारे एक गाणे लॉन्च झाले आहे.
यशराज प्रॉडक्शन्सने हे गाणे आणले आहे. विजय बनकर प्रस्तुत आणि अण्णास वाडे यांनी गायलेले हे गाणे सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. प्रबोधनात्मक असलेल्या या गाण्यात सद्यस्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. त्यामुळे ते अनेकांना भावते आहे. सर्वसामान्य, शेतकरी, राजकीय कार्यकर्ते, नेते या सर्वांचेच अचूक चित्रण यात केले आहे. शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे या पक्षाचे उपनेते अद्वय हिरे पाटील यांनी या गाण्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे.
बघा या गाण्याचा व्हिडिओ