मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची धडाडणारी तोफ म्हणून सुषमा अंधारे यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे या आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांमधील जोश, उत्साह कायम ठेवताना दिसतात. अनेक विषयांचा व्यासंग असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे या बोलायला उभ्या राहिल्या की, भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळते. त्या विरोधी पक्षांवर कठोर टीका करतात, परंतु ही टीका योग्य पद्धतीने असते असे म्हटले जाते. काही वेळा त्या भावुकही होतात, परंतु एका कार्यक्रमात त्या शरद पवार यांच्या संदर्भात बोलताना ढसाढसा रडल्या.
सुषमा अंधारे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच अश्रू अनावर झाले.शरद पवार यांच्यासमोर भाषण करताना सुषमा अंधारेंनी दिल्लीत घडलेली एक घटना सांगितला. हे सांगताना त्या भावनिक झाल्या आणि ढसाढसा रडल्या. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यामुळेच माझे संपूर्ण कुटुंब सुरक्षित असल्याचेही नमूद केले. अंधारे यासाताऱ्यात भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या फुले आंबेडकर साहित्य पंचायत पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होत्या.
अंधारे यावेळी म्हणाल्या की, आमदार अश्लाघ्य पद्धतीने माझ्याबद्दल टीपण्णी करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही सभागृहात आपण सगळे विरोधी पक्षनेते म्हणून बाकावर बसतो. तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावरील अश्लाघ्य वक्तव्या विरोधातील तक्रार का नोंदवली नाही असा प्रश्न विचारायला हवा होता. तसेच माझे चुकत असेल तर तुम्ही कान पकडा, मी लाख वेळा माफी मागायला तयार आहे. कारण मी तुमच्याकडे हक्काने बोललेच पाहिजे शरद पवारांना लोक आधारवड म्हणतात. त्यांनी राजीनामा दिल्यावर मी जे पत्र लिहिले होते तेच मी वाचणार आहे या पत्राची प्रिंट काढून पवारांना दिल्याचे मला सांगितले गेले. मात्र, हे पत्र मी पुन्हा एकदा वाचून दाखवलं पाहिजे मला शरद पवार यांचा राजीनामा नको होतो, म्हणून मी हे पत्र लिहिले होते.
केवळ पक्ष म्हणून नाही, तर महाराष्ट्रातील बहुजन, उपेक्षित तळागाळातील अठरापगड जातीची बुज जाण असणाऱ्या कुणालाही पवारांचा राजीनामा मानवणार नाही. शरद पवारांमुळे माझं संपूर्ण कुटुंब सुरक्षित दिसत आहे. अनेक नेत्यांनी चार चार महिन्यांनी माझे मेसेज बघितले, मात्र, मी शरद पवारांना मेसेज केल्यावर त्यांचे स्वीय सहायक सतीश राऊत यांनी अगदी मोठ्या भावासारखा फोन केला आणि शरद पवारांपर्यंत माहिती पोहचवली. त्यानंतर माझ्या एका फोननंतर पुढील ६ तासात मी दिल्लीत शरद पवारांसमोर हजर होते शरद पवारांनी माझे म्हणणे ऐकून घेतले. कुटुंबप्रमुख भेटल्याप्रमाणे मी स्वतःला आवरू शकले नाही आणि अक्षरशः शरद पवारांसमोर रडले
आता आमदार म्हणून निवडून आलेले शिंदे गटातील आहेत, ते स्त्रियांविषयी अत्यंत हिणकस दृष्टीकोन बाळगतात, अश्लाघ्य पद्धतीने बोलतात, बाई म्हणजे पायातील वहाण आहे असे वागतात. मग तो सत्तार असेल, शिरसाट असेल किंवा कुणीही असेल या सगळ्यांमध्ये प्रचंड मनुवादी विचार वाढलेला आहे त्यांना सत्तेवरून खाली खेचायला हवे, त्यासाठी महाविकास आघाडी हवी आणि मविआसाठी शरद पवार असायला हवेत, असेही अंधारे म्हणाल्या.
Sushma Andhare Crying Video । सुषमा अंधारे स्टेजवर ढसढसा रडल्या, पाहा नेमकं घडलं काय?#sushmaAndhare #CryingVideo #MVA #sharadPawar pic.twitter.com/OfKJYF7wis
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 9, 2023
Politics Leader Sushma Andhare Cried Sharad Pawar