जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते गेल्या आठ दिवसांपासून नॉटरिचेबल आहेत. यामुळे साऱ्यांच्याच जीवाला घोर लागला आहे. जळगावातील नव्या राजकीय घडामोडीची ही नांदीतर नव्हे ना, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यात नेत्यांचे नॉट रिचेबल होणे कार्यकर्त्यांची चिंता वाढविणारे ठरत आहे. त्यातच सामान्य कार्यकर्त्यांसाठी सदा सर्वकाळ फोनवर अगदी सहज उपलब्ध असणारे नेते एकनाथ खडसे नॉट रिचेबल असल्याने जळगाव जिल्ह्यात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
एरवी एकनाथ खडसे कार्यकर्त्यांसाठी अर्ध्या रात्री सर्वकाळ फोनवर अगदी सहज उपलब्ध असतात. पण, एकनाथ खडसे काही दिवसांपासून गायब आहेत. त्यांचा फोन देखील लागत नसल्याने सामान्य कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. खडसे यांचा गेल्या 8 दिवसांपासून कार्यकर्त्यांशी संपर्क झालेला नाही. असे पहिल्यांदाच घडते आहे. एकनाथ खडसे यांचे दोन्ही पर्सनल फोन नंबर्स नॉट रिचेबल आहेत. राज्याच्या राजकारणात काही महत्त्वाची घडामोड समोर येतेय का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खडसे आजारी?
एकनाथ खडसे मुंबईत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र फोनवर संपर्क होऊ शकत नसल्याने जळगावातील त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी वडील सध्या आजारी असल्यामुळे ते आराम करत असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली. या खेरीज त्यासुद्धा फारशा बोलल्या नसल्याने काळजी वाढली आहे.
कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
खडसे हे रोखठोक भूमिका मांडणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून जर त्यांचा फोन हा नॉट रिचेबल असेल तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होणे साहजिकच आहे. तब्येतीचे कारण असो अथवा राजकीय काही अडचण असो यातून कदाचित त्यांचा फोन नॉट रिचेबल असू शकतो. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आपण समजू शकतो.
Politics Jalgaon NPC Leader Eknath Khadse Not Reachable