विजय वाघमारे, जळगाव
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे धक्कादायक निकाल हाती येण्यास सुरूवात झाली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप नेते तथा आमदार मंगेश चव्हाण यांनी मंदाताई खडसे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे.
या निवडणुकीत सर्वाधिक लक्षवेधी लढत मंदाताई खडसे विरुध्द आमदार मंगेश चव्हाण अशी होती. या निवडणुकीत आमदार चव्हाण यांनी विजय मिळवला आहे. एकनाथ खडसे आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यात मोठे वाकयुद्ध रंगले होते. त्यामुळेच हि लढत हायव्होल्टेज मानली जात होती. मंदाताई खडसे यांचा पराभव करत मंगेश चव्हाण यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा निवडणूकीत आरोप-प्रत्यारोपांना जोर चढला होता. २९ जुलै ते ३० ऑगस्टदरम्यान शासनाने नियुक्त प्रशासक मंडळाच्या काळातच ब श्रेणी तूप लोणी विनानिविदा विकण्यात आल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. तर आ. मगंश चव्हाण यांनी आपण एक पैशाचाही अपहार केलेला नाही. दूध संघातील अपहाराचे अटकसत्र हे खडसे कुटुंबाच्या दारापर्यंत पोहोचले आहे. त्यांची अटक अटळ आहे. त्यामुळे खडसेंचा आकांडतांडव सुरू आहे, अशा शब्दात खडसेंच्या आरोपांना आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले होते.
Politics Jalgaon District Milk Society Eknath Khadse Set Back