मुंबई – राज्याच्या राजकारणात थोड्याच वेळात ऐतिहासिक सामना रंगणार आहे. निमित्त आहे ते कोकणातील चिपी विमानतळाच्या उदघाटनाचे. या उदघाटन सोहळ्याच्या व्यासपीठावर एकत्र येणार आहेत दोन्ही कट्टर विरोधक. अर्थात शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेते तथा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे. या दोघांमध्ये हाडवैर असले तरी गेल्या अनेक वर्षात ते एकाच व्यासपीठावर आलेले नाहीत. आज मात्र ते येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या समारंभाकडे लागले आहे.
राणे हे पूर्वी शिवसेनेतच होते. शिवसेनेत असतानाच ते मुख्यमंत्री झाले होते. मात्र, उद्धव यांच्याकडे पक्षाची सूत्रे गेल्यानंतर राणे सेनेतून बाहेर पडले. तेव्हापासून राणे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष चालत आला आहे. दोन्ही नेते एकमेकांवर अत्यंत शेलक्या शब्दात टीका करीत असतात. त्यासाठी ते एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आज शनिवार (९ ऑक्टोबर) कोकणातील चिपी विमानतळाचे उदघाटन आहे. या उदघाटन समारंभाला मुख्यमंत्री ठाकरे आणि मंत्री राणे हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. गेल्या अनेक वर्षात असा प्रसंग घडलेला नाही. त्यामुळे दोन्ही नेते एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद साधणार का, साधला तरी ते काय बोलणार, दोन्ही नेते त्यांच्या भाषणात एकमेकांवर टीका करणार की स्तुती यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष उद्याच्या कार्यक्रमाकडे लागले आहे.
पत्रिकवरुन रंगले राजकारण
उदघाटन सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेवरुन कोकणातील राजकारण गरम झाले आहे. मंत्री नारायण राणे यांचे नाव थेट तिसऱ्या नंबरवर गेल्याने राणे समर्थक संतप्त झाले आहेत. या पत्रिकेत पहिले नाव मुख्यमंत्री ठाकरे यांचे आहे. तर दुसरे केंज्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आहे. पत्रिकेच्या नाराजीची झलक कार्यक्रमात पहायला मिळणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
दिग्गजांची मांदियाळी
कार्यक्रम सोहळ्याला दिग्गजांची मांदियाळी उपस्थित असणार आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, हवाई वाहतूक राज्यमंत्री डॉ. वी के सिंह, उगद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, पर्टन मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासह अनेक मान्यवरांचा त्यात समावेश आहे.
अशी आहे कार्यक्रम पत्रिका