नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निवडणुकीच्या तोंडावर अनेक धक्कातंत्र वापरण्याचा प्रघात भारतीय जनता पक्षामध्ये आहे. त्यामुळे निवडणुकीआधी मुख्यमंत्री बदलासह विविध प्रयोग केले जातात. नवख्यांना संधी, जुन्यांना बाजूला करण्याचे प्रकार तर अतिशय ख्यात आहेत. त्यातच आता राजकीय वर्तुळात भाजपच्या नव्या ट्रेंडची चर्चा जोर धरत आहे.
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक केंद्रीय मंत्र्यांचे दौरे सुरू झाले आहेत. त्यातच भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार आणि उपमुख्यमंत्री ईश्वरप्पा यांना तिकीट देण्यात आलेले नाही. याआधी गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक झाली तेव्हा तेथील माजी मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनाही तिकीट नाकारण्यात आले.
म्हणजेच, दोन राज्यांमध्ये माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बाजूला साकारण्याचा प्रघात भाजप रुढ करु पहात आहे. यामागे मोठे राजकारण, जातीपातीची वोटबँक यासह अनेक कारणे असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मात्र, हाच पॅटर्न पुढील वर्षी महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कायम राहिल का, असा प्रश्न विचारला जात आहे. तसे झाले तर भाजपचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काय होणार, असा सवाल उपस्थित करीत राजकीय वर्तुळात घमासान चर्चा रंगली आहे.
तसेच, भाजपच्यावतीने हा पॅटर्न उद्या कुठे कुठे दिसू शकतो? राबविला जाऊ शकतो, त्यामुळे कुणाकुणाचे पत्ते कट होणार, त्यांचे पुढे काय होणार मध्य प्रदेशसह अन्य राज्यांमध्येही काय होणार, अशा सर्वच चर्चांचा धुराळा सध्या उडाला आहे.
काल भाजपाने कर्नाटकची यादी जाहीर केली. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार आणि उपमुख्यमंत्री ईश्वरप्पा यांना तिकीट दिलं नाही
याआधी गुजरातमध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनाही तिकीट दिलं नाही
हा पॅटर्न उद्या कुठे कुठे दिसू शकतो?
— Prashant Kadam (@_prashantkadam) April 12, 2023
Politics Election BJP CM Dycm Fadnavis Karnataka Gujrat Trend