मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्षाच्या नावाने असलेल्या बँक खात्यातील ५० कोटी वर्ग करण्याची मागणी करणारे ठाकरे यांचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भर सभागृहात जाहीर केले. शिंदे गटावर ५० खोके, एकदम ओक्के असे म्हणत टीका करणाऱ्यांना या माध्यमातून मुख्यमंत्र्यांन कडक प्रत्युत्तर दिले.
शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून सातत्याने त्यांच्यावर ५० खोके, एकदम ओक्के अशी टीका करण्यात येत आहे. ५० खोक्यांचा आरोप करणाऱ्या ठाकरे गटाला मुख्यमंत्र्यांनी जोरदार उत्तर दिले आहे. विधानसभेत अंतिम आठवडा चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल करताना म्हटले की, आमच्या ५० आमदारांना खोके आणि गद्दार म्हणता. त्याचा सोसोक्षमोक्ष लावला पाहिजे. कोणी बेईमानी केली हे समोर यायला हवे. बोलता खुप येत मात्र माझा तो स्वभाव नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. ५० कोटी रुपये तात्काळ वर्ग करा असं बँकेत पत्र देता. पक्ष आमच्याकडे आहे मग पैसे कसला मागता असा सवाल करताना एक मिनीटाचा विचार न करता मी तात्काळ देऊन टाकले. आम्हाला तुमची संपत्ती नको. बाळासाहेब यांचे विचार हीच आमची संपत्ती असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
बँकेला विनंती
शिवसेना पक्षाचे खाते असलेल्या एसबीआय बॅंकेतील दोन एफडी आणि बँक खात्यातील ठेवी एकूण ५० कोटी रुपये परत मिळवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांनी भारतीय स्टेट बॅंकेला विनंती पत्र पाठवले होते. मात्र बॅंकेने ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांना या निधीवर आता तुम्ही खातेदार नसून तुम्हाला अधिकार नसल्याचे सांगितले. तुम्हाला हा निधी परत मिळवायचा असेल तुमचे हे पत्र आम्ही आता जे खातेदार आहेत त्या शिवसेना पक्षाच्या अधीकृत नेत्यांकडे पाठवतो, असे कळवले. त्यानुसार एसबीआय बँक व्यवस्थापनाने सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांचे पत्र शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले. ते पत्र मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
politics eknath shinde exposed letter uddhav thackeray
UBT Shivsena Fund 50 Crore Subhash desai anil desai sbi bank fd