अयोध्या (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. एखाद्या मंत्र्याचा अचानक कुठे दौरा ठरला की लगेच त्याच्या चर्चा सुरू होतात. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वेगवेगळ्या घटना घडत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अचानक अयोध्या दौरा विशेष चर्चेत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षातील आमदार-खासदार व नेत्यांचा अयोध्या दौरा निश्चित होता. त्यानुसार गेल्या दोन दिवसांत अनेक कार्यकर्ते व नेते अयोध्येत दाखल झाले. आणि आज (रविवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले. पण शिंदेंचे लखनऊ विमानतळावर आगमन होताच त्यांनी देवेंद्र फडणवीसही थोड्याचवेळात येत असल्याची माहिती पत्रकारांना दिली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. दुपारी बाराच्या सुमारास फडणवीस अयोध्येत दाखल झाले.
एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा भाजप समर्थित असला तरीही त्यांच्याच पक्षाचे लोक या दौऱ्यात जाणार होते. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चार आमदार अयोध्येत दाखल होत असल्याचे कळल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळीच चर्चा सुरू झाली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या काही तास गायब होण्याची चर्चा जोरदार रंगत आहे. त्यावर अजितदादांनी स्पष्टीकरण दिलेले असले तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा काहीतरी गडबड सुरू आहे, अशीच शंका व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत सहभागी होण्याचा निर्णय निश्चितच चर्चेचा ठरत आहे.
?सदियों से चली आ रही हिंदू मन की आशा जल्द ही पूरी हो रही है। अयोध्या नगरी में अयोध्या के राजा प्रभु श्रीराम का भव्य मंदिर बन रहा है। इस पवित्र राम जन्मभूमि स्थल पर पहुंचने के बाद मन उत्साह से भर उठा। मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, मेरे कैबिनेट सहयोगियों और भाजपा-शिवसेना के मित्रों… pic.twitter.com/m8paPN30rf
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 9, 2023
दिल्लीला जायचे होते
उपमुख्यमंत्री खरं तर दिल्ली येथे एका बैठकीसाठी रवाना होणार होते. पण त्यांनी अचानक अयोध्येला जायचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यानंतर लखनऊ येथून दिल्लीला रवाना होतील, अशी माहिती देण्यात आली.
शरयू नदीवर महाआरती
सायंकाळी सहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरयू नदीच्या तिरावर महाआरतीमध्ये सहभागी होतील. त्यानंतर रात्री ९ वाजता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी त्यांची भेट आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती असेल, अशी चर्चा आहे.
हॉटेलची सजावट
अयोध्येतील पंचशील हॉटेलमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह इतर पाहुण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या हॉटेलच्या बाहेर उत्तर प्रदेश जनसंपर्क विभागाने स्वागताचे फलक लावले आहे. तर हॉटेलच्या बाहेर फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली आहे.
This is how Prabhu Shri Ram Mandir construction work is going on in Ayodhya.
Ariel view from chopper on way to Ayodhya from Lucknow.
॥ Jai Shri Ram ॥#jaishriram #rammandir #ayodhya #ayodhyarammandir #uttarpradesh #ramlala #trending pic.twitter.com/LOZV9YkjVp— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 9, 2023
Politics DYCM Devendra Fadnavis Ayodhya Tour