मंगळवार, सप्टेंबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अमृता फडणवीसांच्या कृतींबाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच मत मांडलं (व्हिडिओ)

by Gautam Sancheti
जुलै 23, 2023 | 3:41 pm
in संमिश्र वार्ता
0
amruta devendra fadanvis e1657101922588

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील पॉवरफुल नेता म्हणून देवेंद्र फडणवीस ओळखले जातात. त्यांच्याशी बोलायची, अनेक गोष्टी जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. नुकतेच ते ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात आले होते. तेव्हा त्यांनी अनेक गोष्टी उघड केल्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस हे राज्यातील महत्त्वाचे कपल आहे. हे दोघेही आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत. त्यांच्या क्षेत्रातील योगदानासाठी ते नेहमीच चर्चेत असतात. अमृता फडणवीसांना कलाक्षेत्राची आवड असून त्या उत्तम गायिका आणि समाजसेविकाही आहेत. अमृता फडणवीस कायमच त्यांचं मत ठामपणे मांडतात. नुकतंच देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पत्नीच्या मोकळेपणाच्या वागण्यावर भाष्य केले आहे.

The most dangerous, poisonous & ferocious animals are only humans ! #FridayFeeling pic.twitter.com/qSHNuQq3Y6

— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) July 14, 2023
देवेंद्र फडणवीसांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी त्यांना पत्नी अमृता फडणवीसांबद्दल प्रश्न विचारण्यात आले. “अमृता वहिनी बेधडक मत मांडतात, कृती करतात. राजकारणात असं फार कमी वेळा दिसतं. एकमेकांना स्पेस दिल्यामुळे तुमची जोडी अगदी अनुरुप वाटते, हे तुम्ही कसं काय जमवलं”, असा प्रश्न अवधूत गुप्तेने त्यांना विचारला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं.

अवधूतच्या या प्रश्नावर फडणवीस म्हणतात, हे काही फार जमवावं लागतं, असं मला वाटत नाही. एकमेकांच्या भूमिका एकमेकांना क्लिअर असल्या की फार गोंधळ होत नाही. आम्ही पहिल्या दिवसापासूनच असं ठरवलं होतं की तिने तिचं जीवन जगायचं आणि मी माझं जीवन जगणार. व्यक्ती म्हणून तिची काही मतं आहेत. ती प्रत्येकवेळी मला पटतात असं नाही, पण तो तिचा अधिकार आहे. त्यामुळे मी तिला आडकाठी करत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आप कितने भी व्यस्त हो, दुनिया के किसी भी
कोने में हो , तन और मन से सेहतमंद रहने के लिए – एक चटाई बिछाकर #yoga करना ना भूलें ! #YogaEveryday #YogaDay #YogaDay2023 #YogaEveryday #yogapractice #InternationalDayofYoga #InternationalYogaDay2023 #InternationalDayofYoga2023 #yogagirl pic.twitter.com/cYjB31dkKg

— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) June 21, 2023

फडणवीस म्हणाले की, तिची अनेक मतं मला पटत नाहीत. तिच्या अनेक कृतीदेखील मला पटत नाहीत. पण तो तिचा अधिकार आहे. जर तिला इतकं बेधडक वागायचं असेल तर हा त्रास सहन करावा लागेल. कारण आपल्याकडे अजूनही इतकं पुढारलेपण आलेलं नाही की, महिलांनी इतकी मोकळी मतं मांडावीत. राजकारण्यांना तर हे अजिबातच पचत नाही. तिची मतं मला पटत नाहीत. पण ती मतं मांडण्याचा तिला अधिकार आहे. तो मी कधीही हिरावून घेणार नाही”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तिची मतं मला पटत नाहीत पण, तिला मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.
आपल्या समाजात अजूनही कितीही पुढारलेले असलो तरी, महिलांनी थेट मोकळी मतं मांडणे हे पचनी पडत नाही..
हालाँकि मैं उनके विचारों से सहमत नहीं हूँ लेकिन उन्हें विचार व्यक्त करने का पूरा अधिकार है।
अपने समाज में हम कितने भी… pic.twitter.com/W2H2UevyTJ

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 23, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बालिकेवर शाळेतच लैंगिक अत्याचार… संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार…

Next Post

राज्यातील सर्व विमानतळांच्या विकासासंदर्भात राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

ed
संमिश्र वार्ता

ईडीने बाईकबॉट घोटाळ्याप्रकरणी ३९४.४२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता केली जप्त

सप्टेंबर 1, 2025
jail11
क्राईम डायरी

नाशिकमध्ये भरवस्तीत गावठी दारूचे गाळप….महिलेसह अन्य एकास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सप्टेंबर 1, 2025
Education6ZT1 e1756688555854
संमिश्र वार्ता

आश्चर्य…थंड मीरा ताऱ्यांमुळे वैश्विक विस्ताराच्या स्वतंत्र दराच्या मापनाला मिळाला नवा आधार

सप्टेंबर 1, 2025
WhatsApp Image 2025 08 30 at 5.36.53 PM
संमिश्र वार्ता

श्री साईबाबा संस्थानची ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

सप्टेंबर 1, 2025
shinde fadanvis pawar1 e1710312448933
महत्त्वाच्या बातम्या

आंदोलनावर आज तोडगा निघणार? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची रात्री उशीरा बैठक

सप्टेंबर 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कोठेही पैसे गुंतवू नका, जाणून घ्या, सोमवार, १ सप्टेंबरचे राशिभविष्य

ऑगस्ट 31, 2025
Screenshot 20250831 192907 Facebook
स्थानिक बातम्या

धक्कादायक…नाशिक येथे नंदिनी नदीमध्ये स्फोटके…हजारो कांड्या गोण्यामध्ये मिळाल्या

ऑगस्ट 31, 2025
Screenshot 20250831 144755 Facebook
महत्त्वाच्या बातम्या

जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी आता सरकारला नवा पर्याय…केले हे आवाहन

ऑगस्ट 31, 2025
Next Post
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

राज्यातील सर्व विमानतळांच्या विकासासंदर्भात राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011