इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार राहुल गांधी गुरुवारी मणिपूरमध्ये पोहोचले. इम्फाळला पोहोचल्यानंतर ते मदत छावण्यांना भेट देण्यासाठी चुरचंदपूरच्या दिशेने जात होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा ताफा वाटेत अडवला. त्यामुळे राहुल गांधींचा ताफा पुन्हा इंफाळला परतला आहे. संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी घटनास्थळी गोंधळ घातला. कार्यकर्त्यांनी पोलीस बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कडक कारवाई करावी लागली. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल यांचा ताफा इंफाळच्या आधी सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या बिष्णुपूर जिल्ह्यात थांबला होता. परिसरात हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना पाहता पोलीस त्यांना पुढे जाऊ देत नव्हते. बराच वेळ परवानगी न मिळाल्याने राहुल हे इंफाळला परतले.
दरम्यान संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी घटनास्थळी गोंधळ घातला. कार्यकर्त्यांनी पोलीस बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कडक कारवाई करावी लागली. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या.
काँग्रेसचे गंभीर आरोप
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, राहुल गांधींच्या ताफ्याला पोलिसांनी बिष्णुपूरजवळ रोखले आहे. आम्हाला परवानगी देण्यासारखी स्थितीत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. राहुल गांधींना अभिवादन करण्यासाठी लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे आहेत. आम्हाला समजत नाही की त्यांनी आम्हाला का रोखले? ते म्हणाले की, राहुल गांधींचा हा दौरा पीडित लोकांना भेटण्यासाठी आहे. आम्ही जवळपास २०-२५ किमी प्रवास केला, पण कुठेही रस्ता अडवला नाही. राहुल गांधी कारमध्ये बसले आहेत. स्थानिक पोलिसांना कोणी सूचना दिल्या हे मला माहीत नाही. त्याचवेळी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट केले की, पंतप्रधान कदाचित गप्प राहणे पसंत करू शकतात, परंतु मणिपुरी समाजातील सर्व घटकांचे ऐकून त्यांना मदत करण्याचे राहुल गांधींचे प्रयत्न का थांबवले जात आहेत?
असे पोलिसांनी सांगितले
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाटेत हिंसाचाराच्या भीतीने काफिला थांबवण्यात आला. बिष्णुपूर जिल्ह्यातील उटलू गावाजवळ महामार्गावर टायर जाळण्यात आले आणि ताफ्यावर काही दगडफेकही करण्यात आली. अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही ताफ्याला बिष्णुपूर येथे थांबण्याची विनंती केली आहे.