नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस पक्षाने माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने डॉ. तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, डॉ. तांबे यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. त्यामुळे पक्षाचीही मोठीच नाचक्की झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारानेच माघार घेतल्याचा संदेश त्यातून गेला. तर, डॉ. तांबे यांचे पुत्र सत्यजित यांनी अपक्ष अर्ज सादर केला आहे. आणि ते आता निवडणूक रिंगणात आहेत. या सर्व परिस्थितीची दखल घेऊन तांबे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच, या सर्व प्रकाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पक्षाच्या अनुपालन समितीचे सदस्य सतिव तारीक अन्वर यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत.
https://twitter.com/INCSandesh/status/1614601802397384706?s=20&t=_1m1VT84qw5rGor4Mvf0DQ
Politics Congress Party Action on EX MLA Sudhir Tambe