मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी काल पत्रकार परिषदेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत शरद पवार यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. ज्या शरद पवार यांना आपल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही ते पवार साहेब आज पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका करत आहेत. पवार साहेब तुम्ही राजकारण करताना कायम साडेतीन जिल्ह्यांचाच विचार केला आणि आज भाजप देशभरात कुठल्या राज्यात आहे आणि कुठल्या राज्यात नाही हे गणित सांगत सुटला आहात असे टीका करतांना बावनकुळे यांनी म्हटले आहे.
काल शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर भाषण केले. तेव्हा त्यांनी पुन्हा येण्याची भाषा केली. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन घेतले असावे, म्हणून ते म्हणाले मी पुन्हा येईन. त्यामुळे त्यांची अवस्थाही फडणवीसांसारखीच होईल. फडणवीस पुन्हा आले मात्र ते खालच्या पदावर आले, असं शरद पवार म्हणाले. या वक्तव्याला बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे.
ज्या शरद पवार यांना आपल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही ते पवार साहेब आज पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्यावर टीका करीत आहेत. पवार साहेब तुम्ही राजकारण करताना कायम साडेतीन जिल्ह्यांचाच विचार केला आणि आज भाजप देशभरात कुठल्या राज्यात आहे आणि कुठल्या राज्यात नाही हे गणित सांगत सुटला आहात.
मोदीजी पुन्हा येणार नाहीत असं भाकीत तुम्ही केलं पण तुमचं हे भाकीत खरं होणार नाही. कारण जनता मोदीजींच्या पाठीशी कालही होती आणि आजही आहे. समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम कुणी केलं हे महाराष्ट्रातील जनतेनं तुमचं सरकार असताना पाहिलंय. त्यामुळे मोदीजींकडे बोट दाखवण्यापूर्वी एकदा आपली कारकीर्द तपासून बघा. बाकी परिवार बचाव पार्टीला सोबत घेऊन तुम्ही कितीही ‘ घमंडीया‘ ची मोट बांधण्याचा प्रयत्न केला तरीही देशातील जनता २०२४ मध्ये सुद्धा मोदीजी आणि भाजपला साथ देईल. याबाबत आपण निश्चिंत राहावे.
Politics Chandrashekhar Bawankule Allegation Sharad Pawar