मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच फोडाफोडीलाही ऊत आला आहे. शिवसेना कोणाची यावरुन उद्धव ठाकरे आणि शिंदे गटामध्ये वाद सुरु आहेच. आता मात्र शिंदे गटालाही धक्का पोहोचवणारी बातमी समोर आली आहे. शिंदे गटात जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत असणाऱ्या दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
गेल्या काही महिन्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली आहे. शिंदे गटाने शिवसेनेतून वेगळे होत भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. हे सगळे सुरु असतानाच आता शिंदे गटालाही भाजपने धक्का देण्यास सुरुवात केली आहे. पालघरमध्ये शिवसेनेच्या २ माजी आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. विशेष म्हणजे प्रवेश केलेले माजी आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेशाने अनेक चर्चा रंगायला लागल्या आहेत.
पालघरमधील शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा आणि विलास तरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या दोन्ही आमदारांनी पालघर जिल्ह्यात विधानसभा निवडणूक लढवली होती. विलास तरे हे दोन वेळा आमदार होते. २०१९मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे ते अस्वस्थ होते. ते शिंदे गटात जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर माजी आमदार अमित घोडा यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे शिंदे गटालाही धक्का बसला आहे.
Politics BJP Shinde Group Leaders Join Rebel
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/