मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना सत्तास्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाने तगडी ऑफर दिली आहे. शिंदे यांच्याकडे तब्बल ४२ पेक्षा अधिक आमदारांचे समर्थन दिसून येत आहे. त्यामुळे शिंदे गटाचे समर्थन मिळाल्यास भाजपला सत्ता स्थापन करणे अतिशय सोपे होणार आहे. त्यामुळेच भाजपने शिंदे यांना मोठी ऑफर देऊन विचार करण्यास भाग पाडले आहे.
भाजपच्यावतीने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हेच गुप्तपणे एकनाथ शिंदे यांना सहकार्य करीत आहेत. त्यामुळेच फडणवीस यांनी शिंदे यांना मोठी ऑफर दिली आहे. त्यात एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद त्यासोबत ८ कॅबिनेट मंत्रिपदे आणि ५ राज्यमंत्री पदे देण्यात येणार आहेत. त्याशिवाय केंद्र सरकारमध्ये दोन मंत्रीपदे देण्याचाही समावेश आहे.
विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये प्रचंड मोठी घडामोड झाली आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेना उभी फोडली असून बहुतांश आमदार गुवाहाटीला नेले आहेत. भाजपला सत्तेची जवळीक दिसू लागल्यानेच शिंदेंना ऑफर दिल्याचे समजते आहे. वरवर भाजपाच्या तंबूत शांतता दिसत असली तरी प्रत्यक्षात पडद्याआड मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे हे समर्थक आमदारांचे पत्र राज्यपालांना देणार असल्याचे सांगितले जात आहे.
politics bjp offer to rebel eknath shinde maharashtra political crisis