नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाची हौस फिटली आहे त्यामुळेच ते आता राज्यात महिला मुख्यमंत्री दिसेल, असे बोलत असल्याची टीका भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्र वाघ यांनी केली. नाशिक दौऱ्यावर आलेल्या वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावरही तोंडसुख घेतले. मिमिक्री केल्याने त्यांची दुकानदारी चालत असेल तर आमची काही हरकत नाही, असेही वाघ म्हणाल्या. ठाकरे माणूस म्हणून चांगले आहेत. पण ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा महिलांवर होणाऱ्या अन्याय -अत्याचाराबाबत विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी आम्ही केली होती. तेव्हा नाही त्यांनी महिलांची कड घेतली. आता मात्र महिला मुख्यमंत्री व्हावा म्हणून बोलत आहेत, अशी टीका वाघ यांनी केली. आमदार संजय राठोड यांना ठाकरे सरकारनेच क्लीन चिट दिली होती, आम्ही तर आजही राठोड यांच्याविरोधात लढत आहोत, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
वाघ यांची संपूर्ण पत्रकार परिषद पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
Politics BJP Leader on Uddhav Thackeray Critic