मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक तीन दिवसाच्या रजेवर गेल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राज्यात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. शिंदे हे रजेवर गेले की त्यांना पाठवले याबाबत तर्कवितर्क लावले आहेत. त्यातच शिंदे हे रजेवर असताना उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस कुठे आहेत असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे.
शिवसेनेत बंडखोरी करीत तब्बल ४० आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली आहे. तसेच, राज्यातील सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याच्या अंतिम निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. हा निकाल केव्हाही येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या शक्यता वर्तविल्या जात आहेत. आणि असे असतानाच आता एकनाथ शिंदे हे अचानक तीन दिवसांच्या रजेवर गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय चर्चा आणि हालचाली गतिमान झाल्याचे बोलले जात आहे. असा स्थितीत देवेद्र फडणणीस दिल्लीला गेले की राज्यातच आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे.
फडणवीस सध्या येथे आहेत
सध्या कर्नाटक विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. ही निवडणूक भारतीय जनता पक्षाने अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळेच सर्व केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजप पदाधिकाऱ्यांची मोठी फौज प्रचाराला लावली आहे. याच अंतर्गत देवेंद्र फडणवीस हे कर्नाटक दौऱ्यावर गेले आहेत. तेथे त्यांच्या काही प्रचार सभा होणार आहेत. तशी माहिती फडणवीस यांनी स्वतः दिली आहे. सोलापूरमार्गे फडणवीस हे कर्नाटकातील विजयपुरा येथे दाखल झाले आहेत.
https://twitter.com/Devendra_Office/status/1650758434344816641?s=20
कर्नाटकातील मराठी आणि अन्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी फडणवीस यांचा प्रचार दौरा आखण्यात आला आहे. त्यानुसार फडणवीस हे दिवसभर कर्नाटकच्या दौऱ्यावर असल्याचे सांगितले जाते. तेथे ते प्रचार सभा, पक्ष बैठक आणि अन्य काही ठिकाणचे दौरे करणार असल्याचे सांगितले जाते.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1650756486614888448?s=20
BJP Leader DYCM Devendra Fadnavis Todays Program