मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणातील भूकंप आणि एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री होणे ही बाब राजकीय इतिहासातील महत्त्वाची घटना आहे. यावरुन विविध तर्कवितर्क सातत्याने लढविले जातात. यासंदर्भात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मोठा खुलासा केला आहे.
फडणवीस यांनी खुपते तिथे गुपते या कार्यक्रमात हजेरी लावली आणि मुलाखत दिली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हाच्या सर्व बाबी स्पष्ट केल्या. फडणवीस हे उपमुख्यमंत्री कसे झाले, त्यांना सगळ्यात मोठा धक्का केव्हा बसला, राज्यपालांनीही आश्चर्य का व्यक्त केले यासह अनेक बाबी त्यांनी यावेळी सांगितल्या.
बघा, त्यांच्या मुलाखतीचा हा व्हिडिओ