बुधवार, सप्टेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मविआच्या संभाजीनगरमधील वज्रमूठ सभेबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले…

by Gautam Sancheti
एप्रिल 3, 2023 | 5:42 pm
in राज्य
0
Chandrashekhar Bawankule

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पार्टीचा विश्वासघात करून मिळवलेली सत्ता हातातून निसटल्याची , मंत्रीपदे हातातून गेल्याची मळमळ उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे या नेत्यांच्या संभाजीनगर येथील सभेत बाहेर पडली , अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केली. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार या डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राच्या विकास कामांना गती मिळाल्याचे पाहून बावचळलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा नेत्यांच्या नावाने शिव्याशाप देऊन आपली निराशा व्यक्त केली, असेही त्यांनी सांगितले.

श्री. बावनकुळे म्हणाले की, सत्तेवर आल्या आल्या उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याशी बेईमानी केली. देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत असताना मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी वॉटर ग्रीडची योजना तयार करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर ही मराठवाड्याच्या विकासाला वेगळे वळण देणारी वॉटर ग्रीड योजना रद्द केली. विदर्भ – मराठवाड्याच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या वैधानिक विकास महामंडळांची मुदत संपल्यावर या महामंडळांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुदतवाढ दिली गेली नाही . राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा विषय संपवा मग वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देऊ, अशी भाषा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना वापरली होती. आता हीच मंडळी मराठवाड्याच्या विकासाच्या नावाने गळा काढताहेत.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पीक विमा योजनेचा बट्ट्याबोळ करून शेतकऱ्यांचे नुकसान केले गेले. शिंदे – फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना अवघ्या एका रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजीनगर नामांतर निर्णय मोदी सरकारने घेतला, मात्र खोटेनाटे सांगून महाविकास आघाडी सरकार त्याचे श्रेय लाटत आहे. संभाजीनगर मध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांना महत्वाचे स्थान होते. त्यांच्यासाठीची खुर्चीही वेगळी होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना या सभेच्या व्यासपीठावर दुय्यम स्थान दिले गेले होते. महाविकास आघाडीतील मतभेद या सभेवेळी स्पष्टपणे दिसून आले, असेही श्री. बावनकुळे यांनी नमूद केले.

Politics BJP Chief Bawankule on MVA Vajramuth Sabha

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राष्ट्रवादी युवकच्या सोशल मिडिया सेलचे प्रमुख कारसह बेपत्ता; पत्नीची गंगापूर पोलिसात धाव

Next Post

दहावी-बारावीचे निकाल कधी लागणार? उशीर होणार का?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Chandrashekhar Bawankule
महत्त्वाच्या बातम्या

आता ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती

सप्टेंबर 3, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

या मार्गावर सुरू होणार रेल्वे…असा असेल रेल्वे मार्ग

सप्टेंबर 3, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडींमध्ये सव्वा चार लाख रूपयाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 3, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

सरकारने केवळ दोन समाजात वाद निर्माण करुन सत्तेची पोळी भाजली…रोहित पवार यांचा आरोप

सप्टेंबर 3, 2025
crime1
क्राईम डायरी

तब्बल सव्वा सतरा लाखाला गंडा…अशी केली फसवणूक

सप्टेंबर 3, 2025
mantralya mudra
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय

सप्टेंबर 3, 2025
manoj jarange e1706288769516
महत्त्वाच्या बातम्या

किडे मकोडयांचं ऐकू नका, राईट काम होणार…मनोज जरांगे पाटील

सप्टेंबर 3, 2025
IMG 20250903 WA0169
राज्य

राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे राज्यातील आरोग्य सेवा ठप्प

सप्टेंबर 3, 2025
Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

दहावी-बारावीचे निकाल कधी लागणार? उशीर होणार का?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011