नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या कांद्यावरील निर्यात मूल्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केली आहे. केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात मूल्य वाढवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या भावनांचा विचार करून सरकारने तातडीने निर्यात मूल्यसंदर्भातील निर्णय मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचे देखील पगार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांच्या संकल्पनेतून ‘युवक संवाद’ मेळावा राष्ट्रवादी भवन येथे संपन्न झाला त्यावेळी अॅड.पगार बोलत होते. मंत्री छगन भुजबळ, मा.खा. समीर भुजबळ यांना अपेक्षित असलेले राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कामकाज प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे व जिल्हाध्यक्ष पगार यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक पद्धतीने तालुका स्तरावर जाऊन युवक जोडो अभियान राबविण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांनी यावेळी घोषणा केली.
यावेळी मेळाव्याप्रसंगी कार्याध्यक्ष गोरख बोडके, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, नाशिक तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. सरपंच परिषेदेचे बाळासाहेब म्हस्के, गौरव गोवर्धने, ऋषिकेश पिंगळे, आदित्य गव्हाणे, अनिल पेखळे, गणेश रिकामे, तुषार खांडबहाले, राज पगार, आकाश पिंगळे, प्रफुल्ल पाटील, कपिल भावले, संदेश टिळे, आनंद ढेरिंगे, योगेश तिदमे, राहुल सहाणे, हरीश चव्हाण, प्रवीण कदम, निलेश जगताप, दुलाजी थोरात, विकास बिरे, अकिल खान, अथर्व निसाळ, आदीसह ग्रामीण भागातील युवा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Politics BJP Allainace AJit Pawar Faction Onion Issue
NCP Farmers Agriculture Demand Export Duty