बारामती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप व शिवसेना महायुत्तीत सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज प्रथमच अजित पवार हे शनिवारी बारामतीत गेले. त्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करुन त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात अजित पवार यांनी मनमोकळेपणे दिलखुलास संवाद साधतांना सांगितले की, बायकोने घेतले नाहीत, एवढे किस आज कार्यकर्त्यांनी घेतले. हे सांगितल्यानतंर सर्वत्र हशा पिकला.
यावेळी ते म्हणाले की, एवढी रेटारेटी, एवढी गर्दी मला भेटण्यासाठी या आधी आयुष्यात कधी पाहिली नाही, अनेकांनी हातात हात घेतले, ढकला ढकली होत होती, हातात हात असताना कार्यकर्ते म्हणत होते, दादा सोडा, व्हढत्यायत, ढकलतायत, काहींनी तर किसच घेतले, है रे पठ्ठ्या, बायकोने घेतले नाहीत, एवढे किस कार्यकर्त्यांनी घेतले.
यावेळी त्यांनी बारामतीकरांचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही, मी जसा आहे, तो बारामतीकरांमुळेच, मला पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची संधी एकनाथरावांच्या मंत्रिमंडळात मिळाली. बारामतीकरांचे मनापासून आभार, शाहु, फुले, आंबेडकरांचा विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम मी करत आलो आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अजित पवार म्हणाले की, तुम्ही झोपेत असताना मी कामे करतो, तुमच्या गर्दीमुळे कामाची साईटच पाहता येत नाही, म्हणून मी पहाटेच साईट पाहून येतो. केंद्राने पिण्याच्या पाण्याच्या योजना केल्या आहेत. पुणे – नगर – नाशिक रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सुदैवाने राज्याच्या तिजोरीची चावी आपल्याकडे आली आहे. मी सत्तेसाठी हापापलेलो नाही, ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही असेही ते म्हणाले.
यावेळी ते म्हणाले की, मी कामात रममाण होणारा कार्यकर्ता, मला काम करायला आवडते, मी जातीचा-पातीचा, नात्याच्या-गोत्याचा विचार केला नाही, शेवटच्या घटकालाही वाटले पाहिजे हा व्यक्ती आपल्यासाठीही काम करतो, अनेकवेळा पद भोगत असताना ते लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून काम करत असतो. लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमी कामे केली. विकासकामे करताना कधीकधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. भावना असते, श्रद्धा असते, पण नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागतो, लोक टीका करतात, पण नव्या पिढीला माहित आहे, हे सर्व बारामतींकरांसाठी मी करतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ajit pawar nagri satkar in baramati
Politics Baramati NCP DYCM Ajit Pawar