मंगळवार, ऑक्टोबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अमित शहांनी स्पष्ट केली भाजपची भूमिका; पदाधिकाऱ्यांना दिले हे थेट निर्देश

सप्टेंबर 5, 2022 | 4:24 pm
in संमिश्र वार्ता
0
Fb4sDvAWQAAm9VI e1662374939445

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेत बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाला सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन करून उद्धव ठाकरेंना दणका देणाऱ्या भाजपने आता आपली भूमिका आणखी स्पष्ट केली आहे. मुंबईत दाखल झालेल्या अमित शहा यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. आपल्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्याचे स्पष्ट आदेशच भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अमित शहा यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजप आणि उद्धव यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत चांगलीच टफ फाईट बघायला मिळणार आहे.

शहा म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी भाजपचा विश्वासघात केला असून त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. राजकारणात आपण सर्व काही सहन करू शकतो, परंतु फसवणूक सहन केली जाऊ शकत नाही, असेही शहांनी म्हटले आहे. शहांनी मुंबई मनपा निवडणुकीच्या तयारीचाही आढावा घेतला. ते म्हणाले की, मुंबई निवडणुकीत मिशन १५० चे टार्गेट कसे गाठता येईल, या आराखड्यावर काम करायला हवे. मुंबई ही देशातील सर्वात मोठी नागरी संस्था आहे आणि भाजप दीर्घ काळापासून ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेला घेरण्याची तयारी चालवली आहे. एवढेच नाही तर काही भागात भाजपलाही राज ठाकरे यांच्यासोबत उतरायचे आहे. यातून शिवसेनेची मते तोडण्याचा त्यांचा डाव असल्याचे मानले जात आहे.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली. तेव्हापासून मुंबई मनपा निवडणुकीत राज ठाकरे भाजप आणि एकनाथ गटासोबत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शहा रविवारी संध्याकाळीच मुंबईत पोहोचले होते आणि आज सकाळी त्यांनी अनेक ठिकाणी गणेशपूजेला हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते त्यांच्यासोबत होते. ते दोन दिवस मुंबईत राहणार आहेत. एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात पोहोचले आहेत. ते भाजपशी संबंधित विषय आणि मुंबई मनपा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करणार असल्याचे मानले जात आहे. विशेषत: सत्तेतून हकालपट्टी करूनही पक्ष टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी यामुळे तणाव वाढू शकतो.

भाजप आणि एकनाथ शिंदे गटातील एकी सध्या कोणत्या पातळीवर आहे. यावरूनही शहरात अनेक ठिकाणी शिंदे गटाच्या नेत्यांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठमोठे बॅनर, पोस्टर लावले होते, हे यावरून समजू शकते. विशेषत: मातोश्रीजवळील परिसरात, वांद्रे पूर्व भागात मोठ्या प्रमाणात बॅनर लागले आहेत, त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे अंतर्गत सूत्र सांगतात, “शहांचं स्वागत करणारे बॅनर हे शिंदे गटाच्या रणनीतीचा भाग आहेत. अमित शहांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची एकनाथ शिंदे यांची ही पद्धत आहे. याशिवाय उद्धव ठाकरे गटाला आरसा दाखवण्याचाही प्रयत्न आहे.

Politics Amit Shah Mumbai Party Meet Direction
BJP Shivsena Uddhav Thackeray Strategy

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात शिंदेंची जोरदार पोस्टरबाजी; उद्धवांचे टेन्शन वाढविण्याची रणनिती

Next Post

नाशिक – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
carona 11

नाशिक - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011