इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आज सपत्नीक कॅरम खेळण्याचा आनंद घेतला, निमित्त होते ते एका केंद्राच्या उदघाटनाचे.
बारामती ज्येष्ठ नागरिक निवास, कै. रघुनाथ गेनबा बोरावके चॅरिटेबल ट्रस्टच्या मेहता भोजन कक्ष व श्रमण करमणूक केंद्र या नूतन इमारतींचे उदघाटन पवार यांच्या हस्ते झाले. या समारंभाला पवार हे सपत्नीक उपस्थित होते. हा कार्यक्रम तांदुळवाडी येथे पार पडला. यावेळी श्रमण करमणूक केंद्रात पवार यांनी सपत्नीक कॅरम खेळण्याचा आनंद देखील घेतला. तसेच, यानंतर आयोजित सभेत पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1660259171399536640?t=owE5LZkcNz2bdtVXrXt_iA&s=03
Politics Ajit Pawar Play Carrom with Wife