इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन-चार महिन्यांपासून मोठी उलथापालथ होत असताना युवा सेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे एक दिवसीय बिहार दौऱ्यावर गेले होते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची बिहारमध्ये जाऊन आज भेट घेतली. त्याच वेळी महाराष्ट्रात मात्र आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावरुन राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे बिहारमध्ये काही महिन्यापूर्वी भाजपची सत्ता होती. पण नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव आणि इतर पक्षांची साथ घेत भाजपला धोबीपछाड देत सरकारमधून आपला पाठिंबा काढला. त्यामुळे भाजपचे सरकार कोसळले. त्यानंतर नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव आणि इतर मित्र पक्षांसोबत मिळून नवीन सरकार स्थापन केले आहे. बिहारच्या नवीन सरकारने सत्ता हाती घेतल्यानंतर प्रथमच आदित्य ठाकरे तेथे गेले , त्यांच्या सोबत शिवसेना खासदार अनिल देसाई, प्रियंका चर्तुवेदी हे देखील उपस्थित होते. आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यामुळे आगामी पालिका निवडणुकीची तयारी सुरू झाल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरे बिहारला पोहचताच पटना येथे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या घरी पोहचले. तेव्हा आदित्य यांच्या स्वागतासाठी तेजस्वी यादव स्वत: बाहेर उभे होते.
महत्वाचे म्हणजे आदित्य ठाकरेंची कार पोहचल्यानंतर हे दोन्ही नेते एकमेकांना मिठी मारत भेटले. तेव्हा आदित्य यांनी कैसे हो? असा प्रश्न तेजस्वी यादवांना केला. तेव्हा तेजस्वी यादव यांनी ‘व्हेरी वेल, वेलकम ‘ म्हणत त्यांना घरात घेऊन गेले. दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. सध्या महाराष्ट्रात भाजपकडून शिवसेनेला संपवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले, भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर कठोर टीका केली जात असताना त्यामुळे भाजपला धडा शिकवण्यासाठी आदित्य ठाकरे हे बिहार दौऱ्यावर गेल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे
बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे परतीच्या प्रवासासाठी पाटणा विमानतळावर आले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आपण बिहारमध्ये का आलो? याचे कारण सांगितले. आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही एकमेकांशी फोनवरून संपर्कात होतो. दोन वर्ष कोविड असल्याने आमची भेट झाली नाही. बिहारमध्ये नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात चांगले काम सुरू आहे. बिहारमध्ये प्रगती होताना दिसते. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोघांची भेट घेतली. दोघांसोबत चांगली चर्चा झाली, तसेच पर्यावरण, विकासाच्या कामावर चर्चा झाली असेही त्यांनी सांगितले.
आज बिहारचे उपमुख्यमंत्री व राजद चे युवानेते @yadavtejashwi यांची पटना, बिहार येथे भेट घेतली. आम्ही आजवर नेहमी संपर्कात राहत होतोच, आता भारतातील युवा म्हणून विविध विषयांवर एकत्र काम करू अशी खात्री आहे. या प्रसंगी छत्रपती शिवरायांची मूर्ती तेजस्वी जीं ना भेट दिली. pic.twitter.com/sXMiBURqFR
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 23, 2022
तसेच पर्यावरण, विकासकामे, वेगवेगळ्या इंडस्ट्रिस, सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशात काही तरुण नेते चांगले काम करण्याचा विचार करत असून रोजगारासाठी चर्चा करण्यास इच्छूक आहे, सर्वांनी काम करत राहीले तर देशात काही चांगले करुन दाखवू शकतो, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. मात्र सध्या आम्ही राजकारण आणि निवडणुकीची चर्चा केलेली नाही. कारण इतर पक्ष त्यावरच चर्चा करतात. पण आज सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच होती की, भेट घेणे जरुरीचे होते. आमच्या दोन्ही कुटुंबाचे संबंध चांगले आहेत. कटुता आलेली नाही. दोस्ती अवितरतपणे जीवंत राहील. त्यांना मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले असून आता भेटीगाठी चालू राहतील. महाराष्ट्रातील पर्यावरण, वन पाहण्यासाठी यावे. प्रत्येकवेळा राजकारण करणे जरुरीचे नाही. तेजस्वी चांगले काम करत आहेत, परंतु देशातील महागाई, रोजगार याविरोधात तरुणांनी एकटवले पाहिजे. सर्वांनी एकत्र काम केले तर देशात काहीतरी चांगले घडेल, असेही ते म्हणाले.
खासदार संजय राऊत म्हणाले की, तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांच्या मदतीने राज्यात राजकीय सत्ता परिवर्तन केले असून अशा तरूण नेत्यांना भेटून देशात मजबूत फळी उभारण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करत आहेत. देशातील प्रमुख नेत्यांना आदित्य ठाकरेंशी संवाद साधायचा आहे. अखिलेश यादव, अभिषेक बॅनर्जी इतर राज्यातील प्रमुख नेत्यांना आदित्य ठाकरे भेटणार आहे. या देशात समर्थ पर्याय उभे करण्याच्या दृष्टीने ही राष्ट्रीय रणनीती आहे, असे राऊत म्हणाले.
पटना येथे बिहारचे मुख्यमंत्री @NitishKumar जी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सध्याच्या विविध विषयांवर चर्चा झाली. नितीशजी वापरत असलेली इलेक्ट्रिक गाडी, पर्यावरण यावरही चर्चा झाली. स्व.बाळासाहेब व उद्धवसाहेबांशी नितीशजींचे जुने संबंध आहेत, त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. pic.twitter.com/s6DeVzOReG
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 23, 2022
Politics Aditya Thackeray Meet Tejaswi Yadav in Bihar
DYCM Patna