नवी दिल्ली (इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क) – सध्या उत्तर प्रदेशात पियुष जैन आणि पुष्कराज जैन या दोन अत्तर व्यापाऱ्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. आता यावरून समाजवादी पक्ष आणि भाजपमध्ये चांगलीच राजकीय धुळवड रंगली आहे. वास्तविक दोघांचे नाव सारखेच म्हणजे पी जैन असले तरी त्यामध्ये एकमेकांचा काही संबंध नाही. एक व्यवसायाने सुंगधी अत्तराचा व्यापारी असून दुसरा व्यवसायिक असला तरी सध्या समाजवादी पक्षाचा आमदार आहे.
पियुष जैन यांच्या कन्नौज निवासस्थानातून सुमारे 17 कोटी रुपये रोख आणि 23 किलो सोने जप्त करण्यात आले असून सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की “एका जैन” वर केंद्रीय अधिकाऱ्यांनी छापा टाकला, ज्याचा भाजपशी संबंध आहे. तर पुष्पराज जैन, हे सपा आमदार असून त्यांनी नवा परफ्यूम गेल्या महिन्यात लाँच केले होते. उत्तर प्रदेशातील कन्नौजमधील त्याच शेजारच्या जैन गल्लीतील आहेत. ते दोघेही एकाच व्यापारात म्हणजे अत्तरच्या व्यापारात आहेत . त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीयूष जैन यांच्या कथितरित्या 194 कोटी रुपयांची रोकड उघडकीस आणलेल्या मालमत्तेवर जीएसटी अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यांकडे लक्ष वेधले आणि समाजवादी पक्षाने त्यांच्या सत्तेच्या कार्यकाळात संपूर्ण यूपीमध्ये “भ्रष्टाचाराचा सुगंध” शिंपडल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की म्हणजे “चुकीच्या जैन” वर केंद्रीय अधिकाऱ्यांनी छापा टाकला की काय ? ज्याचा भाजपशी संबंध आहे.
पीयूष जैन हा श्रीमंत व्यापारी अजूनही कधीकधी स्कूटर चालवतो कानपूर न्यायालयाने करचुकवेगिरीच्या प्रकरणात पोलीसांनी 50 वर्षीय पीयुषला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. त्याच्याकडून जप्त केलेल्या रोख रकमेच्या छायाचित्रे व्हायरल झाली.
तर दुसरीकडे, 60 वर्षीय पुष्पराज जैन यांना कन्नौजमध्ये परोपकारी राजकारणी म्हटले जाते, ज्यांच्याकडे पेट्रोल पंप आणि कोल्ड स्टोरेज युनिट देखील आहे, तसेच शेतीतून उत्पन्न मिळते आणि त्यांचे मुंबईत घर आणि कार्यालय आहे. पुष्पराज जैन 2016 मध्ये इटावा-फर्रुखाबाद येथून एमएलसी म्हणून निवडून आले आणि प्रगती अरोमा ऑइल डिस्टिलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे सह-मालक आहेत, त्यांचे वडील सावेलाल जैन यांनी 1950 मध्ये सुरू केलेल्या व्यवसायाचा विस्तार करत आहेत. पुष्पराज आणि त्यांचे तीन भाऊ व्यवसाय चालवतात.
याबाबत अखिलेश यादव म्हणाले की, आमचे एमएलसी पुष्पराज जैन यांनी आमच्यासाठी परफ्यूम बनवला होता. छापा टाकला त्याचा या एसपीशी काहीही संबंध नसल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी म्हटले की, त्यांना पुष्पराज जैनवर छापा टाकायचा होता, पण चुकून पीयूष जैनवर छापा टाकला. ही डिजिटल इंडियाची चूक वाटते, असे उपरोधिकपणे म्हटले आहे. तर ही छापेमारी सुरू झाल्यानंतर पुष्पराज म्हणाले की, माझा पीयूष जैनशी काहीही संबंध नाही. एकच गोष्ट सामान्य आहे की पीयूष जैन हा माझ्यासारख्याच जैन समुदायातील आहे.