इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रीया येत आहेत. बघा, विविध नेत्यांच्या प्रतिक्रीयांचे हे व्हिडिओ
शिंदे म्हणाले हा सत्याचा विजय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, हा लोकशाहीचा विजय आहे. सर्व पदाधिकारी, खासदार, आमदार यांचा विजय आहे. आपला देश घटनेवर चालतो. विचारधारेवर चालतो. त्याचा हा विजय आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1626592239861354496?s=20
देवेंद्र फडणवीस म्हणाले
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल मी त्यांचे आणि राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1626593464463884288?s=20
राज ठाकरेंनी पोस्ट केला व्हिडिओ
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या आवाजातील एक व्हिडिओ ट्विट केला आहे. राज त्यात म्हणाले की, बाळासाहेबांनी दिलेला शिवसेना हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं. या व्हिडिओमध्ये बाळासाहेब म्हणत आहेत की, नेहमी एक लक्षात ठेवा. नाव आणि पैसा. पैसा येतो आणि जातो. पण, एकदा का नाव गेलं की परत येत नाही. काळ्या बाजारातही मिळत नाही. त्यामुळे नावाला जपा.
या व्हिडिओद्वारे राज यांनी उद्धव यांना अतिशय गंभीर टोला हाणला असल्याचे बोलले जात आहे.
https://twitter.com/RajThackeray/status/1626583128084185090?s=20
Political Leaders Reaction After Election Commission on Shivsena