नवी दिल्ली – कोरोना प्रादुर्भावापासून राजकीय नेतेही बचावलेले नाहीत. दररोज कुठल्या ना कुठल्या नेत्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. आज सकाळीच तीन नेत्यांनी कोरोना बाधेची माहिती सोशल मिडियात पोस्ट करुन दिली आहे. त्यात काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग, अकाली दलाच्या नेत्या व माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर-बादल आणि काँग्रेस नेते व प्रवक्ते रणदीप सिंग सूरजेवाला यांचा समावेश आहे.