नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा भाजपचे नेते उद्धव निमसे यांची कन्या रक्षंदा यांचा विवाह काल धुमधडाक्यात झाला आहे. पाथर्डी फाटा येथील हॉटेल ताजमध्ये झालेल्या या शाही विवाह सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
निमसे हे राजकारणातील बडे प्रस्थ मानले जातात. तर महापालिकेत अनेक वर्षांपासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. त्यांची कन्या रक्षंदा ही देखील उच्च शिक्षित आहे. ज्यांच्याशी त्यांचा विवाहबद्ध झाला आहे ते ऋत्विक हे सुद्धा उच्चशिक्षीत आहेत. ऋत्विक हे सुशील भालेराव यांचे चिरंजीव आहेत. हा शाही सोहळा शहरातील गेट वे ऑफ ताज या आलिशान हॉटेलमध्ये संपन्न झाला. राजकारणातील बड्या नेत्यांबरोबरच निकटवर्तीयांनाही विवाह सोहळ्याचे निमंत्रण पाठविण्यात आले होते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. विवाह सोहळ्यासाठी या आलिशान हॉटेलमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. हळदी समारंभ, मुख्य विवाह सोहळा, स्वागत समारंभ यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.
Nashik Political Leader Uddhav Nimse Daughter Wedding Ceremony