इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले आहे. सिंगापूरमधील माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये लालू यादव यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशनच्या यशस्वीतेसाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी यादवांचे संपूर्ण कुटुंब ऑपरेशन थिएटरबाहेर प्रार्थना करत होते. मुलगा तेजस्वी यादवने ट्विट करून ऑपरेशनच्या यशाची माहिती दिली आहे. पप्पांचे किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर त्यांना ऑपरेशन थिएटरमधून आयसीयूमध्ये हलवण्यात आले.
https://twitter.com/yadavtejashwi/status/1599675635634667520?s=20&t=iX5WFoOATQfHSygbyrINaQ
लालू यादव यांची मोठी मुलगी मीसा भारती यांनी सांगितले की, धाकटी बहीण रोहिणी आचार्य हिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. मीसा भारतीने ट्विट करून सांगितले होते की, धाकटी बहीण रोहिणीचे डोनर ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले आहे. ती पूर्णपणे निरोगी असून ती सध्या आयसीयूमध्ये असून वडिलांचे ऑपरेशन सुरू आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी, मुलगी मिसा भारती, मुलगा तेजस्वी यादव आणि कुटुंबातील इतर सदस्य ऑपरेशन थिएटरबाहेर उपस्थित होते. ऑपरेशन यशस्वी होण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. वडिलांना किडनी दान करण्यापूर्वी लालू यादव यांची कनिष्ठ कन्या रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडियावर लोकांच्या शुभेच्छा मागितल्या. तिच्या ट्विटर अकाउंटवरून रोहिणीने लिहिले ‘रेडी टू रॉक अँड रोल, माझ्या शुभेच्छा’.
लालू प्रसाद यादव यांच्या दोन्ही किडनी केवळ २८ टक्के काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला. अखेर त्यांनी कनिष्ठ कन्या रोहिणी ही पुढे आली. त्यानंतर ही शस्त्रक्रीया सिंगापूरमध्ये करण्याचे निश्चित झाले. रविवारी प्रत्यारोपणासाठी त्यांना रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रोहिणीने त्यांचा फोटोही शेअर केला होता. लालू यादव यांना आधीच रुग्णालयात हलवण्यात आले होते. रोहिणीची किडनी सध्या ९० ते ९५ टक्के काम करत आहे. त्याचवेळी लालू प्रसाद यांच्या दोन्ही किडन्या केवळ २८ टक्के काम करत आहेत. प्रत्यारोपणानंतर त्यांच्या किडनी जवळपास ७० टक्के काम करू लागतील, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
https://twitter.com/RohiniAcharya2/status/1599560022467301376?s=20&t=H6uwqJeo7FMGQgpP8CmV1A
Political Leader Lalu Prasad Yadav Kidney Transplant