शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

एकनाथ खडसे मिळवताय खजुराच्या लागवडीतून भरघोस उत्पादन

by Gautam Sancheti
मे 30, 2022 | 5:21 am
in संमिश्र वार्ता
0
Capture 22

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शेतकरी आगळेवेगळे प्रयोग राबवित उत्पन्न घेतात. पारंपरिक शेतीतील पिकाऐवजी तसेच नगदी पिकांमध्ये ऊस, कापूस, द्राक्ष या सारखी पिके घेण्याऐवजी काहीजण आता सफरचंद, शेवगा, काजू यासह अन्य फळबागा बागायती पिके घेऊ लागले आहेत. तरीही अनेक राजकीय नेते यांचे साखर कारखाने असल्याने त्यांच्या शेतामध्ये केवळ ऊसच पिकतो, असे म्हटले जाते. परंतु ‘नाथाभाऊ ‘ म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे मात्र याला अपवाद ठरले आहेत. त्यांनी आपल्या शेतामध्ये पारंपारिक पिकांऐवजी किंवा नेहमीच्या नगदी पीक ऐवजी खजुराची शेती केली असून हा प्रयोग यशस्वी झाला आहे.

खडसे यांना खजुराच्या शेतीतून भरघोस उत्पन्न मिळत आहे. तसेच त्यांना लाखो रुपयांचा नफा देखील होत आहे. गेल्या चाळीस वर्षांच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. विविध आरोपांनंतर त्यांना मंत्री पद सोडावे त्यानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तरीदेखील एकनाथ खडसे सक्रिय राजकारणापासून मात्र काहीसे दूरच दिसतात. अशातच, नाथा भाऊंनी शेतात खजूर लागवडीचा अनोखा प्रयोग केला आहे. आवड म्हणून केलेला हा प्रयोग मात्र नाथा भाऊंसाठी चांगलाच फायदेशीर ठरला आहे.

आपल्या उत्पन्नाचे शेती हे एकमेव साधन असल्याचा दावा एकनाथ खडसे नेहमीच करतात. असाच काहीसा दावा खडसेंनी केला आहे. खजूर शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून पैसे मिळविता येतात, असेही सांगताना खडसे यांनी त्यांच्या खजूराच्या शेतीचे उदाहरण दिले .

मुक्ताई नगरमधील त्यांच्या स्वतःच्या पंधरा एकर जमिनीमध्ये खडसे यांनी गेल्या चार वर्षांपूर्वी आखाती देशात येणाऱ्या खजूर पिकाची लागवड केली आहे. नागपूर येथे एक कृषी प्रदर्शन पाहत असताना त्या ठिकाणी खजूर पिकाची यशस्वी लागवड केल्याची माहिती एका शेतकऱ्याने त्यांना दिली होती. त्यामुळे आपणही ही खजुराची लागवड करावी, असा निर्णय त्यांनी घेतला. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत खजुराची लागवड केली होती. त्या शेतकऱ्यांकडून माहिती घेऊन आपण मागील चार वर्षांच्या पूर्वी खजुराची लागवड केली आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्रात याची रोपं मिळत नसल्यानं अरब देशातून अरबी खजुराची टिश्यू कल्चर रोपे मागवली. एका रोपांचा खर्च लागवड होईपर्यंत पाच हजार रुपयांपर्यंत आला. एका एकरात शंभर रोप आपण लावली आहेत. लागवड केल्यानंतर तिसऱ्या वर्षी काही प्रमाणात खजुराचे उत्पादन आले. शंभर रुपयांप्रमाणे जागेवरच ते विकले

यंदा चौथ्या वर्षी एका झाडाला साधारणतः तीस ते चाळीस किलो इतका माल एका झाडाला लागला असल्याने एक झाडाचं उत्पन्न प्रतिझाड शंभर रुपये किलोप्रमाणे विचार केला, तरी तीन हजार रुपयांपर्यंत पडतं. म्हणजेच, प्रती एकर तीन लाख रुपये आणि पंधरा एकरचा विचार केला तर पंचेचाळीस लाख रुपयांचं उत्पन्न खडसे यांना खजूर शेतीमधून मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सर्वसामान्य शेतकऱ्याला खजूर उत्पादनातून आर्थिक फायदा घेण्यासाठी सरकारनं खजूर रोपांना सबसिडी दिली पाहिजे. बाजार पेठ उपलब्ध करून दिली पाहिजे, तरंच खजूर शेती सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडू शकेल, असं खडसे यांनी म्हटलं आहे. खजूर शेतीसोबत आपण विविध रंगाच्या बिगर बियाण्याच्या जांभूळ शेतीचाही प्रयोग यशस्वी केला आहे. आगामी काळात त्याचेही लागवड क्षेत्र वाढविणार असून सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचविण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचेही खडसे यांनी म्हटले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तिकीटासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही; रेल्वेने आणली ही भारी सुविधा

Next Post

खेलो इंडिया स्पर्धेत यशस्वी खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत घसघशीत वाढ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Untitled 16
महत्त्वाच्या बातम्या

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस या शहारात सुरू होणार…

सप्टेंबर 13, 2025
Maharashtra Police e1705145635707
संमिश्र वार्ता

पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मिळणार संधी….

सप्टेंबर 13, 2025
accident 11
स्थानिक बातम्या

ताहाराबाद – अंतापूर मार्गावर पिकअप व्हॅन आणि टाटा कारचा अपघात…तीन जणांचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी

सप्टेंबर 13, 2025
Next Post
140x570 1

खेलो इंडिया स्पर्धेत यशस्वी खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत घसघशीत वाढ

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011