मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छोटा पडदा म्हणजेच टीव्ही वर अनेक प्रकारचे शो सुरू असतात. यापैकी काही शोची खूपच चर्चा होते, कारण त्यात सहभागी कलाकार आणि खळबळजनक विधान करतात. सध्या लॉकअप हा शो असाच गाजत आहे. कंगना राणौतचा शो ‘लॉकअप’ सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये स्पर्धकांना सुखसोयी सोडून खऱ्या कैद्यांप्रमाणे जगावे लागते. त्यामुळे वेळोवेळी त्यांना त्यांची काही गुपीत रहस्येही सांगावी लागतात. राजकीय विश्लेषक तेहसीन पूनावाला हा शोमध्ये सहभागी होता, आता तो बाहेर पडला, परंतु त्याने जाताना त्याच्या आयुष्यातील एक मोठे रहस्य उघड केले.
वास्तविक, एलिमिनेशनपूर्वी तहसीनला तो बाद होण्याआधी शो मध्ये सुरक्षित ठेवण्याचा पर्याय देण्यात आला होता. पण यासाठी त्याला त्याचे एक गुपीत रहस्य सांगावे लागेल. यात पूनावाला हा साईशा शिंदेला वाचवण्याचा निर्णय घेतो आणि त्याच्या आयुष्यातील एक मोठे रहस्य उघड करतो. हे कळताच सर्व स्पर्धकांना धक्काच बसला.
पूनावाला यांनी सांगितले की, एकदा आयुष्यात त्याला एका करारावर स्वाक्षरी करावी लागली होती. त्यासाठी त्याला देशातील बड्या उद्योगपतीने स्वतःच्या पत्नीसोबत झोपण्यास सांगितले होते. तसेच तहसीनने आणखी सांगितले की, त्यावेळी यासाठी या व्यावसायिकाने काही अटीही ठेवल्या होत्या.
जेव्हा तहसीन त्या व्यावसायिकाच्या पत्नीसोबत रात्री असेल किंवा झोपेल, त्यावेळी व्यावसायिकाच्याही तिथे हजर असेल आणि तो सगळे बघत राहील. खरेच हा प्रकार असा घडला असून या कामासाठी व्यावसायिकाने संपूर्ण नाईट क्लब बुक केला होता, असेही तहसीन म्हणाला.
तहसीनने सांगितले की, जेव्हा हे सर्व घडले तेव्हा माझे लग्न झाले नव्हते. मात्र लग्नापूर्वी मी माझ्या पत्नीला सर्व काही सांगितले होते. यासोबतच त्याने सांगितले की, मला या प्रकरणाचा कोणताही पश्चाताप झालेला नाही.
दुसरीकडे, या ‘लॉकअप शो ‘मध्ये आणखी एक मनोरंजक ट्विस्ट आला आहे. शोची स्पर्धक सायशा शिंदे मुनव्वर फारुकीची फॅन झाली आहे. जेव्हा करण कुंद्रा या शोमध्ये जेलर म्हणून आला होता. यावेळी त्याने सायेशाला तिच्या भावना व्यक्त करण्यास सांगितले. त्यानंतर सायशाने सांगितले की, तिला मुनव्वर फारुकीबद्दल काहीतरी वेगळे वाटू लागले आहे.