लखनऊ – सध्या उन्हाचा कडाका वाढत असल्याने अनेक तरुण नदी, तलाव, कालवे आदी ठिकाणी पोहण्यासाठी जातात, परंतु अनेक वेळा पाण्याचा अंदाज न आल्याने या ठिकाणी बुडण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. परंतु पोलीस मागे लागल्याने नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना मात्र भयानक अशीच म्हणावी लागेल, अशी दुर्घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. परंतु यात पोलिसांचा दोष नव्हता कारण ते तिघे चोरटे होते.
उत्तर प्रदेशच्या चांदौली जिल्ह्यात पोलिसांपासून सुटकेसाठी तीन जनावरे चोरट्यांनी नदीत उडी मारली. तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. आता पोलिस तिघांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. चकिया पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी रात्री जनावर तस्करांना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग करत होते. यावेळी, चकिया-इलया मार्गावरील मंगलोर नजिक कार्मनशा नदी पुलावरून पळ काढत वाहन तेथेच सोडून तीन जनावर तस्करांनी नदीत उडी घेतली. त्यामुळे पाण्यात बुडण्यामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीसांनी दिली असून पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आली आहे.