नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका क्र 3543/2020 नुसार सर्व पोलिस ठाण्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत तसेच राज्य व जिल्हा स्तरावर पर्यवेक्षण समित्या स्थापन करणेबाबत आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने सर्व पोलिस ठाण्यामधील सीसीटीव्ही कॅमे-याबाबत पर्यवेक्षण समित्या स्थापन करण्याबाबत राज्य शासनाच्या गृह विभागाने दि. 8 सप्टेंबर 2021 रोजी निर्देश दिलेले आहेत.सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि शासन निर्णयांच्या अनुशंगाने नाशिक विभागासाठी जिल्हानिहाय पर्यवेक्षन समित्या स्थापन करण्याचे आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दि. 24 फेब्रुवारी 2022 रोजी दिले आहेत. जिल्हा निहाय सीसीटीव्ही पर्यवेक्षन समित्यांची रचना पुढील प्रमाणे –
नाशिक जिल्हा :
1.नाशिक शहर :विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक -अध्यक्ष ,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, नाशिक -सदस्य, श्री. सतीश कुलकर्णी, महापौर नाशिक, मनपा -सदस्य, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामिण -सदस्य
2. नाशिक(ग्रामीण):विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक -अध्यक्ष,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी,नाशिक-सदस्य,बाळासाहेब क्षीरसागर,जि.प.अध्यक्ष,नाशिक -सदस्य,पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण,नाशिक -सदस्य
3. मालेगाव शहर :विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक अध्यक्ष, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, नाशिक-सदस्य, ताहेरा शेख रशीद, महापौर, मालेगाव, मनपा- सदस्य,पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण-सदस्य
अहमदनगर जिल्हा :
1.अहमदनगर शहर :विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक अध्यक्ष,
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी,अहमदनगर-सदस्य, रोहिणी संजय शेंडगे,महापौर अहमदनगर, मनपा-सदस्य,पोलीस अधीक्षक,अहमदनगर-सदस्य
2.अहमदनगर ग्रामीण :विभागीय आयुक्त,नाशिक विभाग नाशिक अध्यक्ष,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी,अहमदनगर-सदस्य,सौ.राजश्री चंद्रशेखर घुले-पाटील,जि.प.अध्यक्ष अहमदनगर-सदस्य,पोलीस अधीक्षक,अहमदनगर-सदस्य
जळगाव जिल्हा :
1.जळगाव शहर :विभागीय आयुक्त, नाशिकविभाग,नाशिक-अध्यक्ष,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, जळगाव-सदस्य,सौ.जयश्री सुनिल महाजन,महापौर जळगाव,मनपा-सदस्य,पोलीस अधीक्षक,जळगाव -सदस्य
2.जळगाव ग्रामीण:विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक अध्यक्ष, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, जळगाव-सदस्य,सौ.रंजना प्रल्हाद पाटील,जि.प.अध्यक्ष जळगाव-सदस्य,पोलीस अधीक्षक,जळगाव -सदस्य
धुळे जिल्हा
1.धुळे शहर:विभागीय आयुक्त,नाशिक विभाग,नाशिक-अध्यक्ष,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी,धुळे-सदस्य,श्री. प्रदीप बाळासाहेब कर्पे,महापौर धुळे,मनपा-सदस्य,पोलीस अधीक्षक,धुळे-सदस्य 2.धुळे ग्रामीण:विभागीय आयुक्त,नाशिक विभाग,नाशिक-अध्यक्ष, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी ,धुळे-सदस्य,श्री. तुषार विश्वासराव रंधे,जि.प.अध्यक्ष धुळे-सदस्य,पोलीस अधीक्षक,धुळे -सदस्य
नंदुरबार जिल्हा:
विभागीय आयुक्त,नाशिक विभाग,नाशिक-अध्यक्ष,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी ,नंदुरबार -सदस्य,ॲड.सिमा वळवी जि.प.अध्यक्ष नंदुरबार-सदस्य,पोलीस अधीक्षक,नंदुरबार-सदस्य
या समित्यांची जबाबदारी ही सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासोबतची उपकरणे यांच्या देखभालीबाबत वेळोवेळी पाहणी करणे.पोलिस ठाण्याचा प्रभारी अधिकारी यांना सीसीटीव्ही कॅमेरे सुरळीत कार्यरत ठेवण्याबाबत व देखभालीबाबत सुचना देणे.सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासोबतच्या उपकरणे सुरु असल्याबाबत राज्यस्तरीय पर्यवेक्षण समितीला मासिक अहवाल सादर करणे.मानवी हक्कांचे उल्लंघन झालेल्या तथापि नोंद न झालेल्या प्रकरणाबाबत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करणे. उपरोक्त समित्यांमधील सदस्य असलेल्या पोलिस अधिकारी यांनी दरमहा न चुकता मासिक अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयांस सादर करणे बंधनकारक राहील. उपरोक्त समित्यांमधील सदस्य असलेले लोकप्रतिनिधी बदलने अथवा कालावधी समाप्त झाल्यास नवनियुक्त महापौर अथवा जिल्हा परीषद अध्यक्षांची नावे संबंधित महानगर पालिका अथवा जिल्हापरीषद कार्यालयाने कळविणे क्रम प्राप्त असेल असे या आदेशात नमुद करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही बाबतच्या काही तक्रारी
divcom.nashik@maharashatra.gov.in या ई मेल पत्यावर नोंदवाव्यात, असे विभागायी आयुक्तांनी सांगितले आहे.