नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बुलेट बाईकचे सायलन्सर बदलून फटाक्यांसारखा मोठा आवाज करणार्या दुचाकी जप्त करून पोलिसांनी कारवाई केली आहे. नाशिकच्या कॉलेजरोड रोडवर फिरणार्या १३ बुलेटचालकांवर गंगापूर पोलिसांनी कारवाईचा करत त्या जप्त केल्या आहे.
या बुलेट तपासणीसाठी आरटीओकडे पाठवल्या जाणार असून, प्रत्येक बुलेटमालकास २० ते २५ हजार रुपये दंड आकारला आहे. त्यामुळे मॉडिफाइड सायलन्सर वापरणाऱ्या बुलेटमालकांचे धाबे दणाणले आहेत. नाशिक शहरात बुलेटच्या सायलन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज होण्याचे प्रमाण वाढले आहे.
याप्रकरणी काही नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहे. मोटार वाहन कायद्यानुसार गंगापूर पोलिसांनी बुलेटमालकांना नोटीस दिली आहे. मोठ्या प्रमाणात आवाज करणारे सायलन्सर लावू नका, अन्यथा यापुढे गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला असल्याची माहिती गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी दिली आ्रहे.