अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात सर्वत्र शिवसैनिक आक्रमक होवून बंडखोर आमदार यांचे निवासस्थान व कार्यालयाची तोडफोड करीत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानी व कार्यालया बाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनानंतर राज्यात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त लावण्यात आला आहे.