इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टीत पोलिसांनी छापेमारी करुन ३ महिला आणि २ पुरुषांना ताब्यात घेतले असून त्यात एकनाथ खडसे यांचा जावई प्राजंल खेवलकर असल्याची माहिती समोर आली आहे.
प्राजंल खेवलकर यांना फ्लॅटमध्ये पार्टी करताना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. खराडी येथील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये ही पार्टी सुरु होती. यात प्राजंल यांचा एक मित्र आमित तीन महिला पार्टीत सहभागी झाल्या होत्या. या पार्टीत दारु, हुक्का, आणि काही प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा पोलिसांनी दावा केला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांची ससुन रुग्णालयामध्ये वैद्यकिय चाचणीसाठी नेण्यात आले. दरम्यान रोहिणी खडसे या सध्या या प्रकरणाची माहिती घेत आहे.