विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पोलिस हा जनतेचा मित्र आहे याचा प्रत्यय दिल्लीतील एका घटनेत आला. सिंगापूर येथून आलेल्या एका ट्वीटनंतर दिल्ली पोलिसांनी त्याची तत्काळ दखल घेत कारवाई केली. यातूनच दिल्ली पोलिसांचे अनोखे दर्शनही दिल्लीवासियांना झाले.
ट्वीट करणार्या तरूणाने मयूर विहारमध्ये राहत असलेल्या आपल्या कुटुंबातील तीन वृद्धांना रुग्णालयात दाखल करण्यास पोलिसांकडे मदत मागितली होती. त्यानंतर थोड्याच वेळात पोलिसांचे पथक अॅम्ब्युलन्ससह तेथे आले आणि त्यांना घटनास्थळी एक वृद्ध महिला ठीक असल्याचे आढळले, उर्वरित दोन वृद्धांना वेळेवर एलबीएस रुग्णालयात दाखल केले.










