नाशिक- महिलांमध्ये प्रचंड इच्छाशक्ती असून महिलांनी निश्चित ध्येय ठेवल्यास ते सहज पूर्ण करू शकतात, माझे वडील हे रेल्वेमध्ये हमाल म्हणून मजुरीचे काम करत होते. आई अशिक्षित होती. त्यामुळे माझ्या परिस्थितीची सर्वांना जाणीव आली असेल मात्र असे असले तरी माझ्या वडिलांनी मी पोलीस उपनिरीक्षक (पी.एस.आय.) व्हावे अशी इच्छा माझ्याकडे व्यक्त केली. सिन्नर तालुक्यातील दुर्गम भागातील गावात माझे शिक्षण झाले असे असले तरी कोणत्याही परिस्थितीत आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करायची अशी मनाशी खूणगाठ बांधून त्या दृष्टीने वाटचाल केलेली अनेक अडचणी आल्या, संकटे आली पण त्याला कधीच वाकले नाही. आणि अखेर माझी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक या पदावर नियुक्ती झाली.वडिलांनी माझ्याकडे बोलून दाखवलेली इच्छा मी प्रतिकूल परिस्थितीत देखील पूर्ण करून दाखवली मात्र इतरही विभागात निवड झाल्याने मी पोलीस उपनिरीक्षक पदाची नोकरी न स्वीकारता समाज कल्याण विभागातील नोकरी स्विकारली असल्याची भावना व्यक्त केली ती श्रीमती कुसुम कर्डेल यांनी. समाज कल्याण विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने संपूर्ण राज्यात ६ एप्रिल ते १६ एप्रिल या कालावधीत “सामाजिक समता” उपक्रम साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत गेले आठवडाभर विविध कार्यक्रम समाज कल्याण विभागात संपन्न झाले या उपक्रमाअंतर्गत आज रोजी समाज कल्याण विभागात कार्यरत असणाऱ्या महिला अधिकारी,कर्मचारी तसेच वसतीगृहातील विद्यार्थिनी यांचा आज मुक्तसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला असता त्याप्रसंगी श्रीमती कर्डेल यांनी आपले प्रवासाचे अनुभव कथन यावेळी केले. परिस्थिती कितीही गंभीर असली तरी महिलांनी ठरविले तर कोणतीही बाब अशक्य नसल्याचेही आशावाद श्रीमती कर्डिले यांनी यावेळी व्यक्त केला.
समाज कल्याण अधिकारी श्रीमती हर्षदा बडगुजर यांनी देखील आपल्या अनुभवात ग्रॅज्युएट होईपर्यंत एमपीएससी चा लॉंग फॉर्म माहित नव्हता मात्र माहिती मिळाली व कोणत्याही परिस्थितीत अधिकारी व्हायची ही भावना मनाशी निश्चित केली त्यादृष्टीने वाटचाल केली त्यातून अनेक परीक्षांमध्ये यश आले व पहिल्या प्रयत्नातूनच समाज कल्याण अधिकारी म्हणून निवड झाली असल्याचे बडगुजर यांनी सांगून महिलांनी मुक्तपणे आपले विचार आपल्या समाजात, कुटुंबात मांडले पाहिजे.असे सांगितले महाज्योती नाशिकच्या व्यवस्थापिका श्रीमती सुर्वणा पगार यांनी देखील त्यांच्या जीवन प्रवासात आलेले अनुभव कथन करताना महिलांनी आपल्याला जे पटतं तेच केलं पाहिजे समाजाची कोणतीही तमा न बाळगता वाटचाल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जात पडताळणी विभागाच्या श्रीमती अनुप्रीता डेंगळे यांनी देखील आधुनिक युगात सर्व सोयी सुविधा विद्यार्थीनीना उपलब्ध असून त्याचा पुरेपूर वापर करून आपला ध्येय सहज गाठता येणे शक्यध आहे, वस्तीगृहातील मुलींनी शासनाच्या सोयी-सुविधांचा लाभ घेणे बरोबर आपली गुणवत्ता वाढवण्यावर देखील भर द्यावा असे यावेळी सांगितले.
नाशिकचा केटीएचएम महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली कुमारी स्नेहल धनराव या विद्यार्थिनीला खरतर गायक व्हायचा आहे मात्र तिच्या वडिलांचे स्वप्न तिला डॉक्टर बनवण्याचे आहे तिने देखील वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम शिक्षण घेऊन डॉक्टर होऊन नंतर गायक आपला छंद जोपासणारा असल्याचे यावेळी सांगितले असे एक नाही तर अनेक महिला ,विद्यार्थिनी आपला प्रवास व्यक्त करत होत्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींनी देखील पुढे करावयाचे करियर याविषयी एकमेकांशी मुक्तपणे संवाद साधला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन अभिवादन करून करण्यात आली. यावेळी समाज कल्याण विभागाचे जनसंपर्क अधिकारी शशिकांत पाटील, कार्यालय अधीक्षक श्री अनिल तिदमे, शांतीलाल सावकार, किशोर भोये,यांच्यासह सहायक आयुक्त कार्यालय, जिल्हा जात पडताळणी सामिंती, तसेच प्रादेशिक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, बीव्हिजी कंपनीत सर सहायक महिला यावेळी मोठ्या संखेने उपस्थित होते..