नाशिक – पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यासाठी विभागीय अर्हता परीक्षा २०१३ मधील पात्र असलेल्या नाशिक ग्रामीण पोलीस दलातील २८ पोलीस हवालदारांना सेवा ज्येष्ठतेच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक पदी बढती देण्यात आली आहे.
याप्रसंगी सर्व पदोन्नती मिळालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे स्वागत व सत्कार पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला.या प्रसंगी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सत्कारार्थी यांना खांद्यावर स्टार व फित लावत पुष्पगुच्छ देऊन पुढील सेवेला शुभेच्छा देत सन्मानित केले. या प्रसंगी नाशिक ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यांची झाली उपनिरीक्षकपदी पदोन्नती
पदोन्नती झालेले पोलीस उपनिरीक्षक प्रमोद आव्हाड,दिलीप गांगुर्डे,प्रकाश गडाख,राजू सूर्यवंशी,युवराज साळवे,दगु सोनवणे,प्रकाश चव्हाणके,राजाराम दिवटे,कैलास देशमुख,दत्तात्रय साबळे,अशोक मोकळ,उत्तम शिंदे,संजय गांगुर्डे,चंद्रकांत दवंगे, मछिंद्र पठाडे,उदयसिंग मोहारे,विजय गायकवाड,चंद्रभान जाधव,कैलास कपिले,बाळू वाघ,अशोक कदम,रावसाहेब त्रिभुवन,विजय सोनवणे,निवृत्ती खोडे,प्रकाश गवळी,रामराव वाघ,दिलीप बोडके,कैलास दरगुडे यांचा समावेश आहे.
….
सेवा जेष्ठतेनुसार उपनिरीक्षक