इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – असे म्हणतात की चोर हे पोलिसांपेक्षा हुशार असतात, परंतु पोलीसही काही कमी नसतात. चोरांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने काहीतरी चोरी करताना काहीतरी पुरावे सोडलेलाच असतात, त्या आधारे त्या चोरांना पकडतात. फक्त त्यासाठी थोडी युक्ती जिद्द आणि चिकाटी अशा प्रकारची चिकाटी हवी असते.
भारतीय पोलिसांमध्ये ती असल्याचे सांगण्यात येते, विशेषतः मुंबई पोलिसांचे खूप कौतुक होते, तसेच ब्रिटनमधील पोलीसांना बॉबी म्हणतात, बॉबी हे जगातील सर्वात हुशार पोलीस समजले जातात. परंतु चीनमधील पोलीस देखील काही कमी नाहीत, त्यांनी एका चोराला अत्यंत युक्तीने पकडले. त्यासाठी चक्क त्यांना भिंतीवरील डासाच्या रक्ताचे नमुने कामी आले. तोच पुरावा समजून त्यांनी चोरांना बेड्या ठोकल्या. हे कसे शक्य झाले?
एका रिपोर्टनुसार, फुझियान प्रांतातील फुझोऊ येथे घरफोडीची घटना घडली होती. चोरट्याने तेथून लाखो किमतीच्या अनेक मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. चीनमध्ये पोलिसांनी चोराला १९ दिवसांनी घरफोडी झालेल्या घरात तपासणी केली. घरात आल्यावर घराचा दरवाजा आतून बंद असल्याने चोर बाल्कनीतूनच घरात घुसल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
येथे चोरांनी चोरी करण्याआधी घरातच जेवण बनवले, एक रात्रही तेथे काढली असे लक्षात आले. कारण स्वयंपाक घरात उरलेले नूडल्स आणि अंड्यांचे कवच आढळले. तसेच, घराच्या मालकाच्या बेडरूममध्ये ब्लँकेटचा वापर केल्याचेही लक्षात आले. असता त्यांना घराच्या लिव्हिंग रूमच्या भिंतीवर दोन मृत डास व रक्ताचे डाग आढळून आले. डासांच्या रक्ताचे थेंबही बाहेर आले होते. पोलिसांनी ते रक्ताचे नमुने घेऊन डीएनए चाचणीसाठी पाठवले.
हे डीएनए नमुने चाई नावाच्या एका गुन्हेगाराशी जुळले, लगेच पोलिसांनी चाईला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीनंतर चाईने अपार्टमेंटमधील घरफोडीसोबतच इतर चार चोरींचीही कबुली दिली. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही डासांनी चोराचा चावा घेतला आणि त्याचे रक्त प्यायले, त्यानंतर चोरट्याने त्या डासांना भिंतीवर ठार केले. अशात ते डासच पोलिसांसाठी उपयुक्त ठरले आणि १९ दिवसांनी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. सोशल मीडियात सध्या ही घटना चर्चेत असून पोलीसांचे कौतुक होत आहे.
Police Interesting Investigation Dead Mosquito DNA