अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अल्पवयीन मुलीस पळवून नेणे आणि शिवीगाळ प्रकरणी अखेर पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्यासह मध्यस्थावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मौजे अंतर्वली येथून अल्पवयीन मुलगी वय १६ हिस घराशेजारील राहणाऱ्या अलीम राजू शेख तरुणाने पळवून नेल्या संदर्भात नेवासा पोलीस स्टेशनला मागील महिन्यात गुन्हा दाखल झाला. मुलीचे वडील व चुलते दिनांक १-०५-२०२२ रोजी नेवासा पो स्टेशन मध्ये मुलीच्या तपासा संदर्भात चौकशी करण्यासंदर्भात आले असता पोलीस निरीक्षक यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मुलीचा घरच्यांना बंद खोलीत सकाळी ११ ते ३ च्या वेळेत डांबून ठेवले होते.
सदर गुन्ह्यात आरोपीचा तपास करायचा सोडून नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी मुलीचे आजोबा यांना आपल्या वरती मोठे कलम दाखल करू तुमच्या सर्व कुटुंबीयांनी सहा महिने जेलमध्ये टाकू तुमचा कुटुंबावर गुन्हे दखल झाले आहे. असे म्हणत तुमचे कलम कमी करण्यासाठी सुनील गर्जे राहणार मौजे कुकाणा यांना मध्यस्थी करून पो निरीक्षक बाजीराव पवार यांनी तडजोड रक्कम रुपये रोख स्वरूपात एक लाख पंचवीस हजार रुपये (१,२५,०००) रुपये संबंधित सुनील गर्जे यांच्याकडे जमा केली. पीडित मुलीचा आजोबांनी सदर रक्कम ही मुलीचा लग्नासाठी जमवलेली असताना पोलीस अधिकाऱ्यांनी बँकेतून काढण्यास भाग पाडले आणि हे चौकशीत देखील निष्पन्न झाले.
सदर विषय हा जिल्हा पोलिस अधीक्षक यांना कळवून पो. निरीक्षक पवार यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सक्तीचा रजेवर पाठवले आणि या संदर्भात चौकशी लावण्याचे निर्देश दिले. दिलेली रक्कम बाजीराव पवारांनी पीडीत तरुणीला परत देखील केली. चौकशीत निष्पन्न झाल्या प्रमाणे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार आणि सुनील गर्जे यांच्या दोघांवर भा.द.वि 384,385, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
Police Inspector Bajirao pawar booked
Newasa Police Station Crime