इंदूर (मध्य प्रदेश) – लहान बालकांची नेहमीच काळजी घ्यावी लागते. ते थोडे देखील नजरेआड झाल्यास काहीतरी विपरीत घडू शकते. त्यातच या लहान मुलांना बोलता येत नसल्यास, ते फक्त चालत जाऊन कुठेही गायब होऊ शकतात. आणि त्यामुळे पालकांच्या जीवाला घोर लागू शकतो. इंदूर शहरात अशीच एक घटना घडली. परंतु सुदैवाने काहीही विपरित घडले नाही. कारण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
चार वर्षांची मुलगी दुपारी भरकटल्याने बेपत्ता झाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून चार तासांत त्याचा शोध लावला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गोविंद कॉलनीतील आहे. एक ४ वर्षांची करिश्मा उर्फ गुड्डू नावाची मुलगी घरातून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. या मुलीकडे २ हजारांची बनावट नोट असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तरीही ती नोट खरी असल्याचे समजून ती मुलगी दुकानातून वस्तू घेण्यासाठी कॉलनीत गेली. वाट चुकल्याने ती घरी परतली नाही आणि बहुधा कोणीतरी तिचे अपहरण केले असावे, असे पालकांना वाटले.
पोलिसांनी तिचा फोटो इंटरनेट मीडियावर व्हायरल करून तीन टीम बनवून शोधकार्याला पाठवले. त्यापुर्वी येथील एका ठिकाणाहून फुटेज काढले असता, मुलगी नोटा घेताना दिसली. पोलिसांनी हे फुटेज व्हायरल केले आणि पथके कामाला लावली. काही वेळाने एक मुलगी रडत जात असल्याचे एका तरुणाने सांगितले. आईचे नाव सांगितले पण वडिलांचे नाव कळले नाही. पोलिसांनी करिश्माचे वडील ऋतुराज यांना पोलिस ठाण्यात बोलावून मुलीला त्यांच्या हवाली केले, तसेच तिला चॉकलेट, कपडे दिले.