इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आंध्र प्रदेश पोलिसांनी तब्बल ८५० कोटी रुपयांचा गांजा पेटवून दिला आहे. ऑपरेशन परिवर्तनअंतर्गत विशाखापट्टणम जिल्ह्यातील अनाकापल्लीजवळ कोडुरू गावात ८५० कोटी रुपयांचा दोन लाख किलोहून अधिकचा गांजा नष्ट केल्याचे पोलिसांनी सांगितले. डीजीपी गौतम सवांग म्हणाले, की आंध्र प्रदेशमध्ये गेल्या दीड वर्षांत पोलिस आणि एसीबीने दोन लाख किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे. राज्यात गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या गांजाचा व्यापार, त्याचे जाळे आणि तस्करीवर लगाम लावण्यात आला आहे. डीजीपी म्हणाले, गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबरला ऑपरेशन परिवर्तन सुरू करण्यात आले होते. या ऑपरेशनच्या मागे गांजाचा पुरवठा बंद करण्याचा उद्देश आहे. या मोहिमेचे नेतृत्व आंध्र प्रदेश पोलिसांनी केले. विशाखापट्टणममधील एओबी (आंध्र-ओडिशा सीमा) संस्थेच्या विशेष प्रवर्तन ब्युरोच्या सहकार्याने हे ऑपरेशन चालवण्यात आले.
https://twitter.com/APPOLICE100/status/1492446109603889153?s=20&t=0vdU_0HHwTYJUVO1cIRLEA
ओडिशामध्ये अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या माफियांचे जाळे आहे. तिथून संपूर्ण देशात गांजा पोहोचवला जातो. आध्र प्रदेश पोलिस म्हणाले, नोव्हेंबर २०२१ पासून फेब्रुवारी २०२२ पर्यंत आंध्र पोलिसांनी ७,५५२ एकरात पसरलेल्या गांजाच्या शेती नष्ट करण्यात आली आहे. त्यादरम्यान २ लाख किलो गांजा कापणीनंतर बाहेर पाठवताना जप्त करण्यात आला होता. हा २ किलो गांजा पेटवून देण्यात आला. पोलिसांनी गांजाची शेतीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या विशाखापट्टणम जिल्ह्यात आंध्र प्रदेश-ओडिशा सीमा आणि त्याच्या जवळच्या परिसरात अनेक छापे मारले. ऑपरेशन परिवर्तनचे दोन भाग आहेत. एक म्हणजे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि दुसरा सतर्कता बाळगणे. २०१६-२०१७ मध्ये ३ हजार एकर क्षेत्रातील गांजाची शेती नष्ट करण्यात आली होती.