इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणत्याही कार्यालयात रजा हे प्रकरण अत्यंत संवेदनाशील आणि नाजूक असते. रजा मागण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला आपल्याला रजा मिळेल की नाही ? अशी चिंता भेडसावते. कारण सर्वच साहेब लोक आपली रजा मंजूर करतील, असे नाही. यासाठी काही कर्मचारी रजा मागण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगतात. काही वेळा ही कारणे खरी असतात, तर काही वेळा वेगळाच फंडा अवलंब करून रजा मागावी लागते. मात्र सध्या एका कर्मचाऱ्यांनी मागितलेल्या रजेच्या पत्राची चांगलीच जोरदार चर्चा सुरू आहे. त्याने रजेसाठी लग्न ठरत असल्याचे कारण देत रजा मागितल्याने त्याचे हे पत्र चांगलेच व्हायरल होत आहे.
मोठ्या कष्टाने स्थळ आले…
पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी तथा नोकरी ही अत्यंत आगळीवेगळी मानले जाते, त्यांना केव्हाही ड्युटीवर बोलविण्यात येते, इतकेच नव्हे तर रजेवर असताना देखील कामावर हजर राहण्याचे आदेश मिळतात. त्यामुळे पोलीस कर्मचारी वैतागून जातात. तसेच रजा मागितल्यास वरिष्ठांकडून अनेक अडचणी सांगितल्या जातात मात्र एका पोलीस कर्मचाऱ्यांनी रजा मागण्याचे कारण दिल्याने त्याची चर्चा होत आहे. एका कॉन्स्टेबलचे रजेचे पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कॉन्स्टेबल राघव चतुर्वेदी यांनी पत्रात रजा घेण्याचे कारण नमूद केले असून त्याचे लग्नाचे वय निघून जात असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, हे पत्र आता सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहे. या विचित्र पत्रावर लोकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. सध्या वरिष्ठ अधिकारी यांनी कॉन्स्टेबलच्या १५ दिवसांच्या सीएलला मान्यता दिली आहे. मात्र रजेचा अर्ज आणि त्याचे कारण हा लोकांमध्ये चर्चेचा विषय राहिला आहे.
अधिकाऱ्याने घेतला हा निर्णय
उत्तर प्रदेशातील फारुखाबाद जिल्ह्यातील यूपी पोलिस कॉन्स्टेबल राघव चतुर्वेदी यांनी पत्रात रजा घेण्याचे कारण नमूद केले असून त्याने म्हटले आहे की, मोठ्या कष्टाने चांगले स्थळ आले आहे. मुलीला भेटायला जायचे आहे, कृपया पाच दिवसांची रजा द्या, असे म्हटले आहे. खरे म्हणजे केवळ या पोलीस कॉन्स्टेबलचेच नव्हे तर आणि तरुण मुलांचे लग्नाचे वय उलटून जात आहे, हा आजच्या काळात अत्यंत गंभीर सामाजिक प्रश्न बनत चालला आहे. त्यामुळे विचार त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला देखील दया आले असावी, आणि त्यांनी त्या कर्मचाऱ्यांची रजा मंजूर केली आहे. राघव चतुर्वेदी याने अर्जात कॉन्स्टेबलने लिहिले आहे की, तो पोलीस दलात तीन वर्षांपासून कार्यरत असून आता लग्नाचे वयही जवळ येत आहे. आजकाल पोलिसांसाठी स्थळ येत नाहीत. वडिलांनी फोन करून सांगितले की, त्यांना एक चांगले स्थळ सापडले आहे. मुलगी पाहण्यासाठी पाच दिवसांचा अवधी द्यावा. रजेचा असा अर्ज वाचून अधिकाऱ्यांनी ५ दिवसांची रजा मंजूर केली. मात्र या राज्याच्या पत्राची सध्या चांगली चर्चा सुरू आहे कारण ते सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे.
Police Constable Leave Application Letter Viral Social Media