इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भुरटे चोर छोट्या मोठ्या चोर्या करतात, परंतु काही अट्टल गुन्हेगार हे मोठमोठी वाहने चोरून नेतात, परंतु त्याचा सुगावा लागत नाही. कारण ते सराईत गुन्हेगार असल्याने एखाद्या श्रीमंता सारखी त्यांची वर्तणूक आणि वागणूक असते. त्यामुळे कोणाला संशय येत नाही, असेच एका गुन्हेगाराने राजस्थानमधून येऊन मध्य प्रदेशातील अनेक शहरांमधून मोठ्या चोऱ्या करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. या गुन्हेगारांनी पाच राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दरोडा टाकून मौल्यवान वस्तू आणि संपत्ती लुटली आहे, गुन्हे शाखेने हायप्रोफाईल चोर शेरसिंग मीना उर्फ शेरू उर्फ रतनसिंग धाद्रेंला अटक केली आहे. देशभरात शेकडो आलिशान गाड्या चोरणाऱ्या शेर सिंगने इंदूरमधूनही अनेक गाड्या चोरल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे शेरसिंग हा कार चोरण्यासाठी विमानाने येत असे. तेथे येण्याआधीच तारांकित हॉटेल्समध्ये त्याचा सुट बुक झाला होता. पोलिसांनी त्याला गुरुग्राम येथून अटक केली.
पोलीस आयुक्त मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेर सिंग हा मूळचा करौली (राजस्थान) येथील आहे. त्याच्यावर दिल्ली, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशसह विविध राज्यांत दरोडा, चोरी, वाहनचोरी, दरोडा असे ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना चकमा देऊन शेरसिंग आठ वेळा पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला आहे. यामुळे ४० हून अधिक पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. सुमारे दीड वर्षापूर्वी तो दारा (कोटा) येथील जंगलात चालत्या ट्रेनमधून हातकडी घेऊन पळून गेला होता. यानंतर त्याला अटक करण्यात आली असली, तरी जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा वाहनचोरीला सुरुवात केली. यावेळी शेरसिंग इंदूरमधून गाड्या चोरून इतर राज्यात विकत होता. गुन्हे शाखा आणि लासुडीया पोलिस स्टेशन आरोपींची चौकशी करत आहेत. चोरी करताना शेरसिंग त्याच्या मैत्रिणी किंवा पत्नीसोबत रस्त्याने जात असे, त्यामुळे कोणाला संशय येत नसे.
मोहित बन्सल यांची कार चोरीला गेली होती. पोलिसांनी सनसिटी (देवास) येथून बेवारस ही कार जप्त केली असता, कारमध्ये टॅबलेट, सिम, साधने, नंबर प्लेट, टॉर्च आढळून आले. सिमची तपासणी केली असता, नोएडा-गुरुग्राम (एनसीआर) ची लिंक सापडली. तेव्हा गुरुग्रामला रवाना झाली आणि कॉल डिटेल्सच्या आधारे शेरसिंगला रात्री उशिरा गुरुग्राममधून अटक केली. शेर सिंगला सशस्त्र पोलीस दलाच्या कडक निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. चौकशीत त्याने खजराना परिसरातून गाड्या चोरल्याची कबुली दिली आहे.