इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – समजा आपल्या बँकेत साधारणतः दोनशे दोन हजार रुपये असतील तर आपल्याला फार तर हजार किंवा दीड हजार रुपयांची रक्कम काढता येईल. परंतु एका तरुणाने बँकेत केवळ दोन हजार रुपये असताना चक्क ७६ लाख रुपये काढले, हे त्याला कसे काय शक्य झाले ? तर डिबेट कार्डच्या सहाय्याने त्याने बँकेच्या पैशांवर डल्ला मारला. कारण त्याचे डेबिट कार्ड थेट बँकेच्या सर्व अशी लिंक झाले. परंतु त्याच्या एका कारणाने उघड झाल्याने अखेर त्याला अटक करण्यात आली.
व्यवसायाने शेतकरी असलेल्या करण शर्मा यांचे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये खाते आहे. त्यांच्या खात्यात फक्त १९८३ रुपये होते. मात्र त्याचे डेबिट कार्ड बँकेच्या सर्व्हरशी जोडले गेले. यानंतर करणला लॉटरी लागल्याचे वाटले. त्याचे मन फिरले आणि खरेदी सुरू केल्याने सुमारे 76 लाख रुपये खर्च झाले. दुसरीकडे बँकेला याची माहिती मिळताच बँकेच्या मुख्य खात्यातील ४१ लाख रुपये गोठवले. त्याचवेळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी करण आणि त्याची पत्नी आंचल सिंगला अटक केली. त्याच्याकडून सुमारे ७ लाख ५० हजार रुपयांचा माल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्नावमधील कांचनपूर सिरवैया गावातील रहिवासी करण शर्मा यांचे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये खाते आहे. दरम्यान त्याचे डेबिट कार्ड बँकेच्या सर्व्हरशी लिंक झाले. त्यांच्या खात्यात पैसे नसतानाही १९ डिसेंबरपासून त्यांनी खरेदी करताना कार्डद्वारे पेमेंट केल्यावर खात्यात पडलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम भरण्यात आली. यानंतर करणने सतत खरेदी सुरू केली. करणने ही माहिती पत्नी आंचल सिंगला दिली.
आंचल हिने कार, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचा सल्ला दिला. यानंतर दोघांनी बाईक व कार एकत्र बुक केली. बँकेला हे कळण्यापूर्वीच दोघांनी मिळून ७६ लाखांहून अधिकची खरेदी केली. तपास केला असता वास्तव समोर आले. त्यावरून पोलिसांचे पथक तयार करून आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी सुरू करण्यात आली व दोन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून ७,५६,५०० रुपयांचा माल जप्त केला आहे.