मुंबई – राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्याच्या या प्रक्रियेला सुरुवात झाली असून १ नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहित समोर आली आहे. ३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान पोलीस भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. पोलीस भरतीबाबतची सविस्तर माहिती policerecruitment2022.mahait.org आणि WWW.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर मिळणार आहे. मुंबई पोलीस दलात ६ हजार ७४० पदे रिक्त असून संपूर्ण राज्यात १४ हजार ९५६ पोलीस शिपाई पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात ५ हजार ४६८ पदांचा समावेश आहे.